Home बातम्या व्यवसाय SBI Donation सामाजिक बांधिलकी; करोना संकटाचा सामना करण्यासाठी ‘एसबीआय’ची आर्थिक मदत

SBI Donation सामाजिक बांधिलकी; करोना संकटाचा सामना करण्यासाठी ‘एसबीआय’ची आर्थिक मदत

0
SBI Donation सामाजिक बांधिलकी; करोना संकटाचा सामना करण्यासाठी ‘एसबीआय’ची आर्थिक मदत

[ad_1]

हायलाइट्स:

  • करोना कहर झालेल्या राज्यांत रुग्णांसाठी १००० बेड्सचे तात्पुरते हॉस्पिटल उभारण्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी
  • जिनोम सिक्वेन्सिंग संदर्भातील सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी बँकेचे १० कोटी
  • एसबीआयने आपल्या सर्व १७ स्थानिक प्रमुख कार्यालयांना दिला २१ कोटी रुपयांचा निधी

मुंबई : संकटात असलेल्या देशाला पाठिंबा देण्याच्या आपल्या ध्येयाशी व धोरणाशी सुसंगत राहात स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) कोविड- १९ च्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आवश्यक उपक्रम हाती घेता यावेत यासाठी ७० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. बँकेने कोविडचा मोठा फटका बसलेल्या काही राज्यांत १००० बेड्सचे तात्पुरते हॉस्पिटल, २५० बेड्सची आयसीयू सुविधा आणि १०० बेड्सची विलगीकरण सुविधा बनवण्यासाठी ३० कोटी रुपये दिले आहेत. या सुविधा सरकारी हॉस्पिटल्स आणि संबंधित शहरांतील महानगरपालिकांच्या मदतीने उभारल्या जाणार आहेत.

एका रात्रीच भरमसाठ लस उत्पादन अशक्य; पुनावाला यांनी स्पष्ट केली लस निर्मितीपुढील आव्हाने
तात्पुरती हॉस्पिटल्स उभारण्यासाठी एसबीआय वेगवेगळ्या अधिकृत संघटनांशी खास भागिदारी करण्याच्या प्रयत्नांत आहे. बँक जिनोम सिक्वेन्सिंग/प्रयोगशाळा आणि लस संशोधन उपकरण/सरकारसाठी प्रयोगशाळा यांसाठीही १० कोटी रुपये देणार आहे. त्याशिवाय एसबीआयने आपल्या सर्व १७ स्थानिक प्रमुख कार्यालयांना २१ कोटी रुपयांचा निधी दिला असून त्याचा नागरिकांसाठी जीवरक्षक आरोग्य उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच हॉस्पिटल्सना ऑक्सिजन पुरवण्यासाठी वापर केला जाणआर आहे. बँकेद्वारे पीपीई किट्स, मास्क, अन्नधान्य आणि अन्नवाटपही सुरूच राहाणार आहे.

करोना संकाटात सोने खरेदी जोरात ; भारतीयांकडून तब्बल ५८ हजार कोटींची सोनं खरेदी
बँकेतर्फे स्वयंसेवी संस्थांशी करार करून व्यापक प्रमाणावर चाचण्या करणे, लसीकरण मोहिमा आखणे, कोविड- १९ संबंधित विषयांवर हेल्पलाइन तयार करणे, ऑक्सिजन पुरवठा करणे आणि इतर महत्त्वाच्या उपक्रमांसाठी १० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

करोनाचा कहर ; सोने-चांदी तेजीत , जाणून घ्या किती रुपयांनी महागले सोने
एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले, ‘दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी समाजाला मदत व्हावी म्हणून आम्ही आमचा खारीचा वाटा उचलत आहोत. आम्ही निधी, स्त्रोतांद्वारे योगदान देण्यासाठी आणि भारतातील नागरिकांपर्यं पोहोचण्याठी तसेच या विषाणूचा सामना करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी बांधील आहोत. मी सर्वांना विनंती करतो, की त्यांनी गरज असलेल्या सर्वांना मदत करावी आणि आपला देश कोविड- १९ मुक्त करण्यासाठी योगदान द्यावे.

बंगालमध्ये भाजपची हार ;सेन्सेक्स-निफ्टी गडगडले, एक लाख कोटींचा चुराडा
एसबीआयने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी विविध हॉस्पिटल्सशी करार केला आहे. बँकेने आपले कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याचेही ठरवले आहे. बँकेने कोविडग्रस्ता कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी देशभरातील आपल्या ६० प्रशिक्षण केंद्रांचे विलगीकरण/क्वारंटाइन सेंटर्समधे रुपांतर केले आहे.

[ad_2]

Source link