Home बातम्या व्यवसाय Sensex Today बंगालमध्ये भाजपची हार ;सेन्सेक्स-निफ्टी गडगडले, एक लाख कोटींचा चुराडा

Sensex Today बंगालमध्ये भाजपची हार ;सेन्सेक्स-निफ्टी गडगडले, एक लाख कोटींचा चुराडा

0
Sensex Today बंगालमध्ये भाजपची हार ;सेन्सेक्स-निफ्टी गडगडले, एक लाख कोटींचा चुराडा

[ad_1]

हायलाइट्स:

  • देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे.
  • नुकताच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचा रविवारी निकाल जाहीर झाला.
  • यात भाजपला संमिश्र यश मिळाले त्यामुळे आर्थिक सुधारणांना खीळ बसण्याची शक्यता आहे.

मुंबई : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. त्यातच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचा रविवारी निकाल जाहीर झाला. यात भाजपला संमिश्र यश मिळाले. या निकालांमुळे सरकारच्या आर्थिक सुधारणांना खीळ बसेल या भीतीने आज गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. त्यामुळे बाजारात उघडताच सेन्सेक्स ६५० अंकांनी तर निफ्टी १८५ अंकांनी कोसळला. अवघ्या पाच मिनिटांत गुंतवणूकदारांना एक लाख कोटींचा फटका बसला.

लशींचा तुडवडा ; ‘सीरम’च्या आदर पुनावाला यांना धमक्यांचे फोन, बड्या नेत्यांचे दबावतंत्र
सलग दुसऱ्या सत्रात भांडवली बाजारात मोठी घसरण झाली आहे. याआधी शुक्रवारी सेन्सेक्स ९५० अंकांनी कोसळला होता. गुंतवणूकदारांचे लक्ष निवडणूक निकालांकडे लागले होते. रविवारी निकाल जाहीर झाले. मात्र संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपला सत्ता काबीज करता आली नाही. तिथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मतदारांनी सत्ता स्थापनेचा कौल दिला. निवडणूक प्रचारा दरम्यान घडलेल्या घटनांचा बाजारावर परिणाम झाला होता.

गुंतवणुकीचा विचार करताय ; या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला निर्णय घेण्यास फायदेशीर ठरतील
सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५१९ अंकांनी घसरला असून तो ४८२६२ अंकांवर आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३५ अंकांनी कोसळला असून तो १४४९५ अंकावर ट्रेड करत आहे. आज आशियातील भांडवली बाजारात नकारात्मक वातावरण आहे. सिंगापूर निफ्टीत ११० अंकांची घसरण झाली आहे.

शिस्तबद्व गुंतवणुकीतून जबरदस्त परतावा ; या योजनेतील SIP गुंतवणूकदारांनी केली कमाई
सध्या बाजारात फार्मा क्षेत्र सोडले तर इतर क्षेत्रात विक्रीचा जोर आहे बँका, वित्त संस्था, ऑटो, आयटी या क्षेत्रात घसरण झाली आहे. बीएसईवर बजाज फायनान्स, एसबीआय, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज या शेअरमध्ये घसरण झाली. निफ्टी बँक इंडेक्स २ टक्क्यांनी घसरला आहे.

[ad_2]

Source link