न्यूटन फेम अमित मसुरकर दिग्दर्शित या सिनेमाची कथा ही काल्पनिक आहे. सिनेमातून एका महिला वन-अधिकाऱ्याचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. तसेच एक अशी अधिकारी जी मनुष्य आणि प्राणी यांच्यातील संघर्ष संतुलित करण्याचा प्रयत्न करत असते. यात येणारी आव्हानं आणि खाचखळगे दाखवण्यात येणार आहेत.
टी- सीरिज निर्मित या सिनेमात शरत सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राझ, इला अरुण, ब्रिजेंद्र कला आणि नीरज काबी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विशेष म्हणजे गेल्यावर्षी विद्याचा ‘शकुंतला देवी’ हा सिनेमाही ओटीटी प्लॅठफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. प्राइम व्हिडिओवर सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या सिनेमांमध्ये हा सिनेमा दुसऱ्या स्थानावर आहे.
आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘गुलाबो सीताबो’ सिनेमाला यापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. परंतु आयुष्मानचा हा सिनेमा अनेकांना आवडला नाही. पण ‘शकुंतला देवी’ लोक प्रथम एकट्या आणि नंतर संपूर्ण कुटुंबासमवेत बर्याच वेळा पाहिले.