Shiv Sena Vs Narayan Rane: राणे केंद्रात मंत्री झाल्यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; दिले थेट आव्हान!

Shiv Sena Vs Narayan Rane: राणे केंद्रात मंत्री झाल्यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; दिले थेट आव्हान!
- Advertisement -

हायलाइट्स:

  • नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया.
  • कोण कुणालं अंगावर घेतं हे तुम्ही येणाऱ्या काळात बघालच.
  • शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिला थेट इशारा.

मुंबई:नारायण राणे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली असून सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग हे खातं त्यांच्याकडे देण्यात आलं आहे. राणेंच्या या प्रमोशननंतर शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया आली असून राणे केंद्रात मंत्री झाल्याने कोकणवासीय आता शिवसेनेला अंतर देतील, या म्हणण्यात काहीच तथ्य नसल्याचे खासदार अनिल देसाई यांनी नमूद केले आहे. Shiv Sena Criticizes Narayan Rane )

वाचा: शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; ‘असा’ आहे नारायण राणे यांचा थक्क करणारा प्रवास

शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आले आहे. शिवसेनेच्या आक्रमकतेला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी राणे यांना बळ देण्यात आले आहे. शिवसेनेचा कोकण हा बालेकिल्ला काबीज करण्याच्या दृष्टीने आणि मुंबई महापालिका जिंकण्याच्या दृष्टीनेही हे भाजपने उचललेले मोठे पाऊल मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांनी शिवसेना स्टाइल प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा: शिवसेनेचा ‘हा’ बालेकिल्ला काबीज करण्यासाठी नारायण राणेंना बळ

शिवसेनेला अंगावर घेण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रिपद दिल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात कोण कुणालं अंगावर घेतं हे तुम्ही येणाऱ्या काळात बघालच, असे आव्हान अनिल देसाई यांनी दिले. भाजपने राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिलं आहे. ते त्याचं काय करतात ते लवकरच दिसेल. आणि शिवसेनेला शह वगैरे द्यायचं म्हणाल तर ते शक्य नाही, असेही देसाई यांनी नमूद केले. राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने कोकणात शिवसेनेला फटका बसेल ही शक्यताही देसाई यांनी फेटाळली. कोकण आणि शिवसेना हे अतुट असं नातं आहे. कोकणवासीय शिवसेनेला कधीही अंतर देणार नाहीत, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेला शह देण्यासाठी की अन्य कोणत्या उद्देशाने मला मंत्री केले हे माहीत नाही. मला कॅबिनेटमध्ये स्थान दिले आहे इतकीच वस्तुस्थिती आहे, असे राणे यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

वाचा: मोदी मंत्रिमंडळ विस्तार : राणे, कराड, पाटील, पवार… महाराष्ट्राचा दबदबा!

Source link

- Advertisement -