हायलाइट्स:
- येत्या जुलै ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये स्पुतनिक लशींचा मोठा साठा राज्याला उपलब्ध होणार आहे. ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
- राज्यांमधील लशींच्या उपलब्धतेचा प्रश्न मिटावा यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून लस आयातीचे एक स्पष्ट धोरण ठरवणे आवश्यक असल्याचे मत आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केले आहे.
- ज्या नागरिकांनी दोन लशी घेतल्या असतील, अशांनीही सर्व नियम पाळणे आवश्यक आहे- राजेश टोपे.
राज्यांमधील लशींच्या उपलब्धतेचा प्रश्न मिटावा यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून लस आयातीचे एक स्पष्ट धोरण ठरवणे आवश्यक असल्याचे मत आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केले आहे. तसे झाल्यास हा प्रश्न जलदगतीने सुटण्यास मदत होणार आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘ज्यांना काम नाही ते लोक असे बोलतात’; अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे नागरिकांना आवाहन
करोना विरुद्धची लढाई लढत असताना लस घेतलेल्या नागरिकांनीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे टोपे म्हणाले. ज्या नागरिकांनी दोन लशी घेतल्या असतील, अशांनीही सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. दोन लशींचे डोस घेतलेल्या नागरिकांनी देखील मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे हे नियम पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे टोपे म्हणाले. सध्या तरी तोंडावरचा मास्क हटणार नाही, असेच टोपे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- पहिल्या शिवस्वराज्य दिनाचा प्रारंभ अहमदनगरमधून, मुश्रीफ यांनी उभारली शिवशक राजदंड स्वराज्य गुढी
जेव्हा लशींचे दोन डोस घेतले जातात तेव्हा शरीरात मोठ्या प्रमाणात अँटिबॉडी तयार होत असतात. शरीरात मोठ्या प्रमाणात अँटीबॉडी तयार झाल्या असतील तरी त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. मात्र लशींचे डोस घेतलेल्या व्यक्तींकडून इतरांना संसर्ग होत नसला तरी देखील मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- हे तर सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण; फडणवीसांनी साधला निशाणा