Home अश्रेणीबद्ध Sunil Chhteri Surpasses Messi: मेसीला मागे टाकत सुनील छेत्रीने केला विक्रम; व्हायरल होतोय हा व्हिडिओ

Sunil Chhteri Surpasses Messi: मेसीला मागे टाकत सुनील छेत्रीने केला विक्रम; व्हायरल होतोय हा व्हिडिओ

0
Sunil Chhteri Surpasses Messi: मेसीला मागे टाकत सुनील छेत्रीने केला विक्रम; व्हायरल होतोय हा व्हिडिओ

दोहा: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आणि अव्वल स्ट्रायकर सुनील छेत्री याने अर्जेंटीनाचा सुपर स्टार लियोनेल मेस्सीला मागे टाकत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. ३६ वर्षीय छेत्रीने सोमवारी फिफा वर्ल्डकप २०२२ आणि एएफसी आशिया कप २०२३च्या पात्रता फेरीच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध दोन गोल केले. यासह छेत्रीच्या आंतरराष्ट्रीय गोलची संख्या ७४ इतकी झाली आहे.

वर्ल्डकप पात्रता फेरीत भारताचा गेल्या सहा वर्षातील हा पहिला विजय आहे. या विजयाचा हिरो ठरलेल्या छेत्रीने जागतिक फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान मिळवले. छेत्रीच्या पुढे आता पोर्तुगालचा ख्रिस्टियानो रोनाल्डो आहे. त्याच्या नावावर १०३ गोल आहेत. बार्सिलोनाचा स्टार मेसी पेक्षा छेत्री दोन गोलने तर अली मबखौत पेक्षा एक गोलने पुढे आहे. मेसीने गुरुवारी चिली विरुद्ध वर्ल्ड कप पात्रता फेरीत ७२वा गोल केला होता.

वाचा- भारताच्या कर्णधाराने मोडला मेसीचा विक्रम; सर्वाधिक गोल क्रमवारीत सुनील छेत्री दुसऱ्या स्थानावर

सोमवारी जासिम बिन हमाद स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ७९ मिनिटाला आणि ९०+२ मिनिटांत दुसरा गोल करून संघाचा विजय निश्चित केला.

भारताच्या या विजयावर आणि छेत्रीच्या या विक्रमावर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनीलचे कौतुक केले. आपला कर्णधार सुनील छेत्रीने मेसीला मागे टाकत ७४ गोलसह सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले. कर्णधाराचे खुप खुप अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा.

वाचा- चूक झाली, बिनशर्त माफी मागतो; भारतीय क्रिकेटपटूचा सोशल मीडियावर माफीनामा

बांगलादेशविरुद्धच्या विजयामुळे भारत सात सामन्यात सहा गुणांसह ग्रुप इ मध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आता भारताची पुढील लढत १५ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.

Source link