Home मनोरंजन Tarrak Mehta-खऱ्या आयुष्यात बापूजींपेक्षा मोठा आहे जेठालाल, तर तीन मुलांचा बाबा आहे बॅचलर पोपटलाल

Tarrak Mehta-खऱ्या आयुष्यात बापूजींपेक्षा मोठा आहे जेठालाल, तर तीन मुलांचा बाबा आहे बॅचलर पोपटलाल

0
Tarrak Mehta-खऱ्या आयुष्यात बापूजींपेक्षा मोठा आहे जेठालाल, तर तीन मुलांचा बाबा आहे बॅचलर पोपटलाल

[ad_1]

हायलाइट्स:

  • मागच्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शो
  • काही दिवसांपूर्वीच या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’नं पूर्ण केलेत ३२०० एपिसोड
  • खऱ्या आयुष्यात बापूजींपेक्षा वयाने मोठे आहेत जेठालाल

मुंबई: लोकप्रिय कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘चा पहिला एपिसोड २८ जुलै २००८ साली प्रसारित झाला होता. जवळपास १३ वर्ष हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण असं असतानाही या शोची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. या शोमधील प्रत्येक व्यक्तीरेखा प्रेक्षकांसाठी खास आहे. अनेक कलाकारांना या शोमुळे स्वतःची ओळख मिळाली आहे. अलिकडच्याच काळात या शोचे ३२०० एपिसोड पूर्ण झाले. पण आजही या शोमधील कलाकारांच्या बाबतीत अशा काही गोष्टी आहेत. ज्या प्रेक्षकांना अद्याप माहीत नाहीत. जाणून घेऊयात अशा अनेक रंजक गोष्टींविषयी…


‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये अभिनेता दिलीप जोशी यांनी जेठालाल तर अभिनेता अमित भट्ट यांनी त्यांच्या वडिलांची म्हणजे बापूजींची भूमिका साकारली आहे. मात्र ऑनस्क्रिन वडिल-मुलाच्या या जोडीमध्ये जेठालाल म्हणजे दिलीप जोशी हे अमित भट्ट यांच्यापेक्षा वयानं मोठे आहेत. तसेच दयाबेन आणि सुंदरलाल ही ऑनस्क्रिन बहीण-भावाची जोडी खऱ्या आयुष्यातही भाऊ-बहीण आहेत. दिशा वकानीनं हा शो सोडल्यानंतर मागच्या काही काळापासून तिचा भाऊ मयूर वकानी देखील या शोमध्ये दिसलेला नाही. याशिवाय या शोमध्ये टप्पूची भूमिका साकारणारा भव्य गांधी टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारा बालकलाकार आहे. त्यानं या शोमध्ये ८ वर्ष काम केलं होतं. तो प्रत्येक एपिसोडसाठी १० हजार रुपये मानधन घेत असे.


‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये आत्माराम तुकाराम भिडेंची भूमिका साकारणारे अभिनेता मंदार चंदवाडकर एक उत्तम गायक आणि खऱ्या आयुष्यात इंजिनिअर आहेत. तर शोमधील ‘बॅचलर-फॉरएवर’ पोपटलाल खऱ्या आयुष्यात विवाहित असून त्यांना तीन मुलंही आहेत. अय्यरची भूमिका साकारणारे अभिनेता तनुज महाशब्दे यांनी या शोचे लेखक म्हणून काम सुरू केलं होतं. पण नंतर दिलीप जोशी यांच्या सल्ल्यानं निर्मात्यांनी त्यांना अय्यरची भूमिका दिली. पण ते खऱ्या आयुष्यात मराठी कुटुंबातील आहेत. याशिवाय शोमध्ये बबिताजींच्या पतीची भूमिका साकारणारे अय्यर खऱ्या आयुष्यात मात्र अविवाहित आहेत.


समय शाहनं या शोमध्ये ‘गोगी’ची तर भव्य गांधीनं ‘टप्पू’ची भूमिका साकारली होती. पण खऱ्या आयुष्यात हे दोघेही चुलत भाऊ आहेत. याशिवाय बबिताजी आणि जेठालाल म्हणजे मुनमुन दत्ता आणि दिलीप जोशी यांनी याआधीही एकत्र काम केलं आहे. तसेच अभिनेता दिलीप जोशी यांनी सुरुवातीला चंपकलाल म्हणजेच बापूजी या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं.



[ad_2]

Source link