हायलाइट्स:
- ‘फॅमिली मन २’ मधील महत्वाचं पात्र आहेत चेल्लम
- उत्तर प्रदेश पोलिसांनी जनजागृतीसाठी घेतली होती चेल्लम सरांची मदत
- मुंबई पोलिसांनीही केलं ट्वीट
जेव्हा सेटवर रणवीरला जाणवलेला पेशव्यांचा आत्म्याचा वावर
मुंबई पोलिसांनीही एक हटके ट्वीट करत गुन्हेगारांना संदेश देण्यासाठी चेल्लम सरांच्या पात्राचा पुरेपूर वापर केला. मुंबई पोलिसांनी ट्वीट करत अंमली पदार्थांचं सेवन करणं गुन्हा असल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी केलेल्या या ट्वीटमध्ये चेल्लम सर एका नागरिकासोबत बोलताना दाखवण्यात आले आहेत. त्यावर एक व्यक्ती त्यांच्याकडे चिलीम मागत आहे. तर चेल्लम सर त्याला हटके स्टाइलमध्ये उत्तर देत म्हणतात, ‘COD (कॉप्स ऑन डिलिव्हरी) साठी १०० डायल करा.’ मुंबई पोलिसांच्या या ट्वीटचं युझर्सही कौतुक करत आहेत.
यापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी चेल्लम सरांच्या मदतीने त्यांच्या क्षेत्रात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी ट्वीट करत संकटात सापडलेल्या प्रत्येक कुटुंबासाठी ११२ हा एकच नंबर असल्याचं म्हटलं होतं. वेब सीरिजमध्ये फार थोड्या कालावधीसाठी दिसलेल्या चेल्लम सरांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.