हायलाइट्स:
- महाराष्ट्र कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी सतर्क.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करोना स्थितीवर बोलले.
- राज्यात आरोग्य सुविधा वाढवण्यावर मोठा भर.
वाचा: मराठा आरक्षणावर केंद्राने लगेच निर्णय घ्यावा!; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण रद्द करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि सध्याची कोविड स्थिती यावर आज समाज माध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबत सतर्क केले. राज्यात गेले काही दिवस रुग्णवाढ हळूहळू खाली येत आहे. काही जिल्ह्यांत रुग्णवाढ उताराला लागली आहे तर काही जिल्ह्यात परत रुग्णवाढ होत आहे. या स्थितीत गाफील राहून चालणार नाही. आपण आता खऱ्या अर्थाने धोक्याच्या वळणावर असून अधिक सावध राहावं लागणार आहे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
वाचा: करोना: राज्यात आज ५७ हजारांवर नवी रुग्णवाढ, ९२० मृत्यू
राज्यात दुसरी लाट येताच जी भीषण स्थिती उद्भवली ती स्थिती तिसऱ्या लाटेच्यावेळी उद्भवू नये यासाठी आपल्याला आताच खबरदार व्हावे लागणार आहे. करोनाची तिसरी लाट येणार आहे, असा अहवाल तज्ज्ञांनी केंद्राला दिला असून त्यासाठी आपल्याला सज्ज व्हावे लागेल. त्यादृष्टीने आपण तयारीही सुरू केली आहे. आपण आरोग्य सुविधा वाढवत आहोत. मिशन ऑक्सिजन आपण हाती घेतले आहे. कोणत्याही स्थितीत आपण ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहोत. त्यासाठी प्रकल्प उभारणीला लागणाऱ्या आवश्यक मंजुऱ्या तत्काळ देण्यात येत आहेत. राज्यात सध्या १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होत असून ती ३ हजार मेट्रिक टनपर्यंत नेण्याचे आपण लक्ष्य ठेवले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
वाचा: मतभेद बाजूला ठेवा!; CM ठाकरे आणि फडणवीसांना संभाजीराजे यांची साद
केंद्राने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कोट्यात वाढ केली आहे. राज्यासाठी तो आजही पुरेसा नसला तरी स्थिती नियंत्रणात आहे. आवश्यकतेनुसार जिल्ह्यांना रेमडेसिवीरचे वितरण आपण करत आहोत. लसीकरणाची जबाबदारीही आपण समर्थपणे पेलणार आहोत. १८ ते ४४ या वयोगटाचे लसीकरण सुरू झाले असून त्याचा वेग वाढवण्याचा प्रयत्न आहे. दिवसाला १० लाख जणांना लस देऊ शकतो इतकी आपली क्षमता आहे पण आज तितक्या लस आपल्याला उपलब्ध होत नाहीत. त्याबाबतच्या समस्यांवर मात केली जात आहे. यात केंद्रापुढेही अनेक अडचणी आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
वाचा: हा माणूस आहे खरा राजा… संभाजीराजेंच्या कौतुकाची पोस्ट व्हायरल