Home ताज्या बातम्या Uddhav Thackeray: विकासाचा ‘हा’ हव्यास जीवनासाठी घातक!; CM ठाकरेंचा महत्त्वाचा संदेश

Uddhav Thackeray: विकासाचा ‘हा’ हव्यास जीवनासाठी घातक!; CM ठाकरेंचा महत्त्वाचा संदेश

0
Uddhav Thackeray: विकासाचा ‘हा’ हव्यास जीवनासाठी घातक!; CM ठाकरेंचा महत्त्वाचा संदेश

हायलाइट्स:

  • निसर्गाचे नियम समजून घेऊन विकास कामांचे नियोजन आवश्यक.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जागतिक पर्यावरण दिनी विधान.
  • निसर्गाने दिलेले झाडांच्या रुपातील नैसर्गिक ऑक्सिजन प्लांट जपा.

मुंबई: पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संस्कार आपल्या भारतीय संस्कृतीने दिला असून विकासकामांचे नियोजन करताना ते निसर्गाचे नियम समजून घेऊन करणे आवश्यक आहे. अन्यथा निसर्ग आपल्या पद्धतीने न्याय देण्याचे काम करतो, असे महत्त्वाचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे. ( Uddhav Thackeray Environment Day Speech)

वाचा:मुंबई पूर्णपणे अनलॉक केव्हा होणार?; करोनाचे ‘हे’ आकडे देताहेत चांगले संकेत

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात २०२०-२१ या वर्षात ‘माझी वुसंधरा’ अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, अमृत शहरांचा तसेच अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या अभियानाच्या २०२१-२२ या वर्षातील अंमलबजावणीचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वन विभागाच्या कांदळवन कक्षाने तयार केलेल्या ‘बायोसेंटिनल्स ऑफ कोस्टल महाराष्ट्रा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.

वाचा: मुंबईत नव्या गाइडलाइन्स; सोमवारपासून काय ‘अनलॉक’ होणार जाणून घ्या

आपल्या आयुष्यातील पर्यावरणाचे महत्त्व वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. शहरातून हरित तृणांची मखमल आता नाहीशी झाली आहे. आपण पृथ्वीला वसुंधरा म्हणतो आणि तिची गणना स्क्वेअर फुटात करतो. वन बीएचके टू बीएचके सारख्या तुकड्यांमध्ये ती वाटतो. पण विकासाचा हा असा हव्यास आपल्या जीवनाला घातक ठरत असल्याचे आहे. आपण आज पंचमहाभूतांपासून दूर जात आहोत. त्यांची जपणूक करण्याऐवजी आपण त्यांच्यावर हुकुमत गाजवत आहोत, असे सांगतानाच करोना काळात आपल्याला ऑक्सिजनचे महत्त्व पटले, त्यातून आपण ऑक्सिजन निर्मिती करत आहोत, पण निसर्गाने दिलेले झाडांच्या रुपातील नैसर्गिक ऑक्सिजन प्लांट आपण उद्ध्वस्त करत चाललो आहोत. याचा आज गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

वाचा: लोकलवरील निर्बंधांबाबत मोठी बातमी; मुंबई महापालिकेला मिळाली ‘ही’ पॉवर

आपली संस्कृती ही पर्यावरणाची जपणूक करणारी संस्कृती होती. त्यामुळेच आपल्याकडे वटपौर्णिमेला वडाची पूजा, नागपंचमीला नागांची पूजा केली जाते. आपल्या पूर्वजांनी पंचमहाभूतांचे रक्षण केले परंतु आता आपल्या घरासमोर साधे तुळशी वृदांवन बांधण्याला जागा नाही, इतक्या इमारती उभ्या राहात आहेत. कांदळवनात भव्य अशी जीवसृष्टी दडलेली आहे, वन आणि वन्यजीवांचे, पर्यावरणातील प्रत्येक सूक्ष्म घटकांचे महत्त्व आणि त्याचे रूप आपण समजून घेणे गरजेचे आहे आणि ते समजून घेता येत नसले तरी ते जपण्याची आणि त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे, तिथे कुणीही कमी पडता कामा नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी केले. माझी वसुंधरा अभियानात सहभागी होऊन पारितोषिक मिळवलेल्या सर्व पुरस्कार्थींचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. तसेच अभियानात सहभागी होऊन उत्तम काम करणाऱ्या आणि सहभाग नोंदवणाऱ्या गाव – शहरातील संस्थांचा, कार्यकर्त्यांचा आणि सर्व सहभागीदारांचा त्यांनी गौरव केला.

पर्यावरण रक्षणाच्या कामात सातत्य हवे: उपमुख्यमंत्री

पर्यावरण रक्षणाचे काम हे काही एक दिवसाचे किंवा काही दिवसांचे नाही, ते नियमित स्वरूपाचे आहे. त्यामुळे पुरस्कार मिळवलेल्या आणि माझी वसुंधरा अभियानात सहभागी झालेल्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी या कामात सातत्य ठेवावे, आपल्या कामातून इतरांना प्रेरणा देऊन त्यांनाही माणसाला जगवणाऱ्या या कामात सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.

वाचा: करोनाचा विळखा आणखी सैल; तीन महिन्यानंतर प्रथमच सर्वात कमी रुग्णांचे निदान

Source link