हायलाइट्स:
- कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबई महापालिका लय भारी.
- सर्वोच्च न्यायालयाने केले मुंबई पालिकेचे कौतुक.
- मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईकरांना दिले सारे श्रेय.
वाचा: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला; CM ठाकरे यांनी केले मोठे विधान
राज्यात काही ठिकाणी आजघडीला करोना रुग्णसंख्येत किंचित उतार दिसत असली तरी आपल्याला गाफील राहून चालणार नाही. राज्याच्या काही जिल्ह्यांमधील वाढती रुग्णसंख्या ही चिंता वाढवणारी बाब आहे. त्यामुळे खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्हा, तालुका आणि वाड्या वस्तीमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना राज्य टास्क फोर्स मधील डॉक्टरांचे मार्गदर्शन देण्यात येत असून रुग्णांना कोणत्यावेळी कोणते औषध किती प्रमाणात दयायचे, गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची काळजी कशी घ्यायची, त्यांना योग्य उपचार देताना योग्य वेळेत गरज पडल्यास दवाखान्यात दाखल कसे करायचे याची माहिती दिली जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
वाचा: मराठा आरक्षणावर केंद्राने लगेच निर्णय घ्यावा!; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले…
केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाची जबाबदारी राज्यावर टाकली असून यातील ६ कोटी लोकसंख्येला दोन डोस याप्रमाणे १२ कोटी डोस एकदम विकत घेण्याची राज्य शासनाची तयारी असली तरी लस उपलब्ध होण्याला मर्यादा आहेत. केंद्र सरकारचीही याबाबत मर्यादा आहे कारण लसीचे उत्पादन हळूहळू वाढत आहे. त्यामुळे जसजशी राज्याला लस उपलब्ध होईल तसतसे या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाईल, नागरिकांनी संयम आणि शिस्त पाळावी, गर्दी करू नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
वाचा: करोना: राज्यात आज ५७ हजारांवर नवी रुग्णवाढ, ९२० मृत्यू
महाराष्ट्रात कडक निर्बंध लावल्याने २५ एप्रिल २०२१ रोजीची ७ लाखाची रुग्णसंख्या आता ६ लाख ४१ हजार इतकी कमी करण्यात यश मिळाले असले तरी काही जिल्ह्यात रुग्णवाढ होत आहे. आपण ४.५ लाख बेड्स राज्यभरात निर्माण केले आहेत. त्यात १ लाख ऑक्सिजन बेड्स आहेत, ३० हजार आयसीयु तर १२ हजार व्हेंटिलेटर बेड्स आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित होतो. आपल्याला १७०० मेट्रिक टन ऑक्सिजन रोज लागतो. वरचा ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन इतर राज्यातून महाराष्ट्राला देण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. आता तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने मिशन ऑक्सिजन अंतर्गत स्वावलंबी होण्याचे उद्दिष्ट ठेवले असून रोज ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाच्यादृष्टीने ऑक्सिजन निर्मिती प्लांटसची उभारणी करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तिसऱ्या लाटेचा घातक परिणाम राज्यावर होणार नाही याचा चंग महाराष्ट्राने बांधला असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
वाचा: मतभेद बाजूला ठेवा!; CM ठाकरे आणि फडणवीसांना संभाजीराजे यांची साद