सेमीफायनल सामन्यात कर्णधार लियोनेल मेसीने संघाच्या विजयासाठी दिलेले योगदान हे सर्वोच्च असे होते. मेसीचा समावेश जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये का होतो याचे उत्तर पुन्हा एकदा मिळाले. कोलंबियाविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात मेसीला दुखापत झाली. त्याच्या पायाला दुखापत झाली होती आणि रक्त येत होते. तरी देखील मेसी मैदानात थांबला. निर्धारीत ९० मिनिटात दोन्ही संघांनी १-१ गोल केले. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त ३० मिनिटात देखील दोन्ही संघांनी गोल केला नाही त्यामुळे विजेता पेनल्टी शूटआउटने ठरवण्यात आला.
वाचा- Video: कोलंबियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव; मेसीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाला इतिहास…
अर्जेंटिनाकडून पहिला शूट कर्णधार मेसीने मारला आणि चेंडू गोल जाळ्यात मारला. शूटआउटमध्ये अर्जेंटिनाने ३-२ असा विजय मिळवला. या विजयात अर्जेंटिनाचा गोलकीपर एमिलियानो मार्टिनेज हा शिल्पकार ठरला. त्याने कोलंबियाचे तीन पेनाल्टी शूट रोखले. यामुळे कोलंबियाला दोन गोल करता आले.
वाचा- युरो कप: पेनल्टी शूटआउटचा थरार, स्पेनचा पराभव करत इटली फायनलमध्ये
रक्त येत होते तरी गोल केला
ऐतिहासिक माराकाना स्टेडियमवर जगातील सर्वोत्तम स्ट्रायकलपैकी एक असलेल्या मेसीने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले की तो सर्वश्रेष्ठ का आहे. सामन्यात ५५व्या मिनिटाला फ्रँक फब्राने मेसीला जोरदार टक्कर दिली, यामुळे तो खालीपडला आणि त्याच्या घोट्याला दुखापत झाली. मेसीच्या घोट्यातून रक्त येत होते. रेफरीने फ्रँकला येलो कार्ड दाखवले.
वाचा- दिलीप कुमार यांनी भारतीय संघाला दिला होता १९८३च्या वर्ल्डकप संघाचा हिरो
ही दुखापत मेसीची जिद्द तोडू शकली नाही. तो शेवटपर्यंत मैदानावर थांबला आणि अर्जेंटिनाला ऐतिहासिक अशा विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन पोहोचवले.
वाचा- धोनीचे ७ निर्णय, ज्याच्यामुळे अख्ख जग दंग झालं
अर्जेंटिनाने १९९३ सालानंतर कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद मिळवले नाही. कर्णधार लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाला इतिहास घडवण्याची संधी आहे. शनिवारी फायनल लढतीत त्यांची लढत गतविजेत्या ब्राझीलविरुद्ध होणार आहे. यजमानपद असताना ब्राझीलचा कोपा कपच्या फायनलमध्ये कधीच पराभव झालेला नाही.
वाचा- शुभमन गिलला इंग्लंड सोडण्याचे आदेश; बदली खेळाडूबाबत ही आहे अपडेट
कोपा अमेरिका स्पर्धेचे सर्वाधिक ९ विजेतेपद अर्जेंटिनाने मिळवले आहेत. त्यानंतर उरुग्वे आणि चिली यांचा क्रमांक लागतो, या दोन्ही संघांनी प्रत्येकी सात वेळा जेतेपद मिळवले आहे. ब्राझील आणि पेरू यांनी प्रत्येकी सात वेळा विजेतेपद मिळवले आहे.