भारतीने तिच्या अकाऊंटवर जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्यात ती झोपाळ्यावर बसून झोके घेताना दिसत आहे. झाडाला टांगलेल्या झोक्यावर बसून भारती झोके घेताना दिसत आहे. एक मुलगी भारतीला झोका देताना दिसत आहे. ती मुलगी झोका देत असताना अचानक भारतीचा तोल जातो आणि ती झोक्यावरून खाली पडते.
झोपाळ्यावरून पडल्यावर भारतीला स्वतःलाच हसू आवरले नाही. ती देखील खळखळून हसाना दिसत आहे. पडल्यानंतर नशीबाने भारतीला फार लागले नाही. हा व्हिडीओ शेअर करताना भारतीने लिहिले, ‘ हॅप्पी रविवार, पडता पडता मी स्वतःला सांभाळले, माझी कंबर तर गेली… ‘
अशा येत आहेत प्रतिक्रिया
भारतीने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर मनोरंजन विश्वातील तिच्या मित्रमंडळींनी त्यावर कॉमेन्ट करायला सुरुवात केली आहे. यामध्ये अनिता हसनंदानी, सुयश राय, किश्वर मर्चेंट, जरीन खान यांचा समावेश आहे. त्यांनी हसण्याच्या स्माईली, हार्टच्या स्माईली पोस्ट केल्या आहेत.
करोना, आईबद्दल बोलताना भावूक झाली भारती
भारती सिंहचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता सोनू सुदशी बोलताना रडताना दिसत आहे. भारतीने सोनूला सांगितले की, तिची आई करोना पॉझिटिव्ह झाली आहे. हे सांगताना भारती खूपच भावूक झाली होती, त्यामुळे सोनू सुद आणि नोरा फतेही यांच्या डोळ्यांतही पाणी आले.