हायलाइट्स:
- अक्षय कुमारचा म्यूझिक व्हिडीओ ‘फिलहाल २’ कही दिवसांपूर्वीच झाला आहे रिलीज
- सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतो अक्षय कुमार
- सध्या अक्षय कुमारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
‘आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?’ गरोदरपणावरून ट्रोल करणाऱ्यांना उर्मिला निंबाळकरचं उत्तर
अक्षय कुमारनं नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो समोरून चालत येताना दिसत आहे. पण चालत असताना तो अचानक धपकन खाली पडतो आणि आपला गुडघा पकडून वेदनेनं कळवळतो. दरम्यान या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला ‘फिलहाल २’चं म्यूझिक वाजत असतं. अक्षय कुमारनं हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, ‘जिथे जास्तीत जास्त वेळी प्रेम तुम्हाला आनंद आणि हास्य देतं पण आता ते वेदना देतंय.’ अर्थात या व्हिडीओतून अक्षय कुमार त्याच्या गाण्याचं प्रमोशन करत आहे. तो खरंच पडलेला नाही.
अक्षय कुमार आणि नुपूर सेनॉन यांचं गाणं ‘फिलहाल २’ काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं आहे. हे गाणं चाहत्यांमध्य खूपच लोकप्रिय झालं आहे. आतापर्यंत २२० मिलियन पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या आधी अक्षय आणि नुपूर यांचं २०१९ साली रिलीज झालेलं ‘फिलहाल’ गाणं युट्यूबवर १ बिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं होतं.
‘वडिलांसोबत थांबायचीही भीती वाटायची’ अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव
अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याच्याकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. अक्षय कुमार आगामी काळात ‘सूर्यवंशी’, ‘पृथ्वीराज’, ‘बेल बॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘राम सेतु’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘रक्षाबंधन’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट २०२०च्या मार्चमध्येच रिलीज होणार होता. मात्र करोना व्हायरस आणि लॉकडाऊन यामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं.