हायलाइट्स:
- टायगर ३ साठी सलमान जीममध्ये गाळतोय घाम
- सलमानच्या वर्कआऊटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
- भाईजानचा व्हिडिओवर चाहत्यांनी दिल्या भरभरून प्रतिक्रिया
सलमानने मंगळवारी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो जीममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. हा मिरर व्हिडिओ असून त्यात सलमानच्या चेहरा स्पष्ट दिसत नाही. परंतु एकूणच देहयष्टीवरून तो सलमानच असल्याचे जाणवते. व्हिडिओच्या बँकग्राऊंडला ‘टायगर जिंदा है’ चं संगीत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सलमानने लिहिले ‘मला वाटतंय ही व्यक्ती ‘टायगर ३’ साठी ट्रेनिंग घेत आहे.’
सलमान खानचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सलमानचे चाहते तो जी मेहनत घेत आहे, त्याचे भरभरून कौतुक करत आहेत.
दरम्यान, टायगर ३ साठी केवळ एकटा सलमान मेहनत घेत आहे असे नाही. तर या सिनेमात खलनायक साकारणारा इमरान हाश्मी देखील जीममध्ये जबरदस्त वर्कआऊट करत आहे. काही दिवसांपूर्वी इमरानने देखील त्याचा वर्कआऊटचा करतानाच फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये इमरानची बॉडी देखील जबरदस्त दिसत आहे.
‘टायगर ३’ या सिनेमात सलमान खानसोबत अभिनेता इम्रान हाश्मी, अभिनेत्री कतरिना कैफ दिसणार आहे. या सिनेमामध्ये सलमान खान एजंट अविनाश सिंह राठोडच्या भूमिकेत झळकणार आहे. तर कतरिना कैफ आयएसआयची एजेंट झोया ही भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मनीष शर्मा करत असून पुढच्या वर्षी हा सिनेमा रिलीज होईल.