Home मनोरंजन Video- ‘तारक मेहता…’ मालिकेतील पोपटला अर्थात श्याम पाठक झळकलेत चिनी सिनेमात!

Video- ‘तारक मेहता…’ मालिकेतील पोपटला अर्थात श्याम पाठक झळकलेत चिनी सिनेमात!

0
Video- ‘तारक मेहता…’ मालिकेतील पोपटला अर्थात श्याम पाठक झळकलेत चिनी सिनेमात!

[ad_1]

हायलाइट्स:

  • अनुपम खेर यांच्यासोबत केले होते श्याम पाठक यांनी काम
  • २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता चिनी सिनेमा
  • फिल्मचा व्हिडीओ सोशल मीडियावर झालाय व्हायरल

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार लोकप्रिय झाले असून प्रत्येकाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. प्रत्येक कलाकाराचा स्वतःचा असा चाहता वर्गही आहे. लोकप्रिय कलाकारांमध्ये पत्रकार पोपटलाल यांचाही समावेश आहे.

मी जशी आहे तसंच सलमान खानने मला दत्तक घेतलं- राखी सावंत

हे पोपटलाल त्यांच्या लग्नासाठी कायमच उत्सुक असतात परंतु त्यांचे लग्न काही ठरत नाही. पोपटलाल ही भूमिका अभिनेता श्याम पाठक साकारत आहेत. श्याम पाठक यांना ‘तारक मेहता’ या मालिकेमुळे खूपच लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का श्याम पाठक यांनी या आधी सिनेमात काम केले आहे. अलिकडेच श्याम यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायल झाला आहे. त्यामध्ये ते एका चिनी सिनेमात दिसत आहे.

AssignmentImage-30893866-1624885618

अनुपम खेरसोबत दिसले होते श्याम पाठक

श्याम पाठक यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ छोटा आहे आणि यामध्ये श्याम पाठक एका चिनी महिलेसोबत बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अनुपम खेरदेखील दिसत आहेत. श्याम पाठक त्या चिनी महिलेसोबत इंग्रजीमध्ये बोलताना दिसत आहेत तर अनुपम यांच्यासोबत हिंदीमध्ये संवाद साधताना दिसत आहेत.

१४ वर्षांच्या मुलीवर १०० हून अधिकदा बलात्कार आणि हत्येची कथा

श्याम यांची ही भूमिका पोपटलालपेक्षा एकदम वेगळी आहे. यामध्ये श्याम यांचे हावभाव एकदम नेमके व्यक्त होत आहेत आणि अभिनय देखील नेहमीपेक्षा एकदम वेगळा दिसत आहे. हा व्हिडीओ जरी छोटा असला आणि त्यात श्याम पाठक यांना फारसा वाव मिळालेला दिसत नसला तरी त्यांचा अभिनय कौतुकास्पद आहे.


एंग ली यांनी केले आहे सिनेमाचे दिग्दर्शन

‘लस्ट, कॉशन’ या सिनेमात श्याम पाठक यांनी काम केले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ख्यातनाम दिग्दर्शक एंग ली यांनी केले असून हा सिनेमा २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. जेव्हा श्याम पाठक यांनी या सिनेमात काम केले होते, तेव्हा ते ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत नव्हते. हा सिनेमा चीन, तैवान, अमेरिका येथे रिलीज झाला होता. या सिनेमातून दुसऱ्या महायुद्धावेळची एक कथा दाखवण्यात आली आहे.



[ad_2]

Source link