Home मनोरंजन VIDEO: दिलीप कुमार यांच्या घराबाहेर आलेली ती वृद्ध महिला कोण? नातेवाईक असल्याचा करतेय दावा

VIDEO: दिलीप कुमार यांच्या घराबाहेर आलेली ती वृद्ध महिला कोण? नातेवाईक असल्याचा करतेय दावा

0
VIDEO: दिलीप कुमार यांच्या घराबाहेर आलेली ती वृद्ध महिला कोण?  नातेवाईक असल्याचा करतेय दावा

[ad_1]

हायलाइट्स:

  • ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे प्रदीर्घ आजाराने निधन
  • करोनामुळे मोजक्या लोकांनाच दिलीप कुमार यांचे अंत्यदर्शन घेण्याची परवानगी
  • दिलीप कुमार यांच्या महिला चाहतीचा अंत्यदर्शनासाठी आक्रोश

मुंबई : हिंदी सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दिलीप कुमार यांचे अंत्य दर्शन घेत सायराबानो यांना धीर देण्यासाठी अनेक कलाकारांनी त्यांच्या घरी धाव घेतली. करोनामुळे मोजक्या लोकांनाच प्रवेश दिला जात आहे. परंतु एक अनोळखी महिलेने दिलीप कुमार यांच्या घरात प्रवेश मिळवण्यासाठी खूप धडपड केली. आपण दिलीप कुमार यांच्या नातेवाईक असल्याचे ती महिला सांगत होती. या महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.

दिलीप कुमार यांचे पार्थिव रुग्णालयातून घरी आणण्यात आले. त्यानंतर काही मोजक्या लोकांना दिलीप कुमार यांचे अंत्यदर्शन घेण्यास परवानगी दिली आहे. दिलीप कुमार यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर एक महिला त्यांच्या निवासस्थानाबाहेर आली. आपण दिलीप कुमार यांच्या नातेवाईक आहोत असे सांगत आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. प रंतु पोलिसांनी त्यांना तिथेच रोखले. परंतु ती महिला ऐकतच नव्हती. अखेर दिलीप कुमार यांच्या घरातील सदस्यांनी ही महिला नातेवाईक नसल्याचा खुलासा केला.

या व्हिडीओमधील ही महिला बुरख्यामध्ये दिसत आहे. तिच्या हातामध्ये जपाची माळ आणि चेह-यावर मास्क आहे. ती अतिशय दुःखी दिसत होती आणि मला आतमध्ये जायचे आहे. मला आत जाऊ द्या… असे ती सातत्याने म्हणत होती. महिला पोलिसांनी तिला अडवल्यावर ती ढसाढसा रडू लागली. तेव्हा महिला पोलिसांनी कशीबशी तिची समजूत काढत तिला एका ठिकाणी बसवले.

या महिलेचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युझर्सनी त्या महिलेबद्दल सहानुभूती व्यक्त करायला सुरुवात केली. ही महिला दिलीप कुमार यांची खूप मोठी चाहती असेल असे मत व्यक्त केले. तर काहींनी दिलीप कुमार यांच्या निधनामुळे त्या महिलेला खूपच दुःख झाले आहे. आता तिला आपल्या लाडक्या अभिनेत्याचे शेवटचे दर्शन घ्यायचे आहे. तिला दर्शन घेऊ द्यात.. असे ही काहींनी मत व्यक्त केले.

दरम्यान, दिलीप कुमार यांचे बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांनी मुंबईतील खार येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर बॉलिवूडमध्ये दुःखाची लाट पसरली. दिलीप कुमार यांचे अंत्यविधी सांताक्रुझ येथील कब्रस्तानात केला जाणार आहे.

[ad_2]

Source link