Video- नायक! ओक्साबोक्शी रडणाऱ्यांना एवढ्या आत्मियतेने भेटतो सोनू सूद

Video- नायक! ओक्साबोक्शी रडणाऱ्यांना एवढ्या आत्मियतेने भेटतो सोनू सूद
- Advertisement -


मुंबई- करोना महामारीत गोरगरिबांसाठी जर कोणी देव म्हणून धावून आला असेल तर तो म्हणजे सोनू सूद. गेल्या वर्षी करोना काळात सुरू झालेल्या लोकांच्या हाकेला तो या क्षणापर्यंत प्रतिसाद देत आहे. गरजूंना मदत करण्यासाठी सर्व काही करण्यास तयार असलेल्या सोनूने देशातील लोकांसाठी खरा नायक कसा असतो याचं उदाहरणच दाखवलं आहे. चाहत्यांनी तर त्याला देवाच्यास्थानीच बसवलं आहे.

सोनूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो आपल्या रडणार्‍या चाहत्यांना भेटताना दिसत आहे. हा चाहता जमिनीवर गुडघ्यावर बसून हतबल होऊन रडताना दिसत आहेत. त्याला रडताना पाहून सोनू सूदही जमिनीवर त्याच्यासोबत बसतो. व्हिडिओमध्ये सोनू सूद मुलाला त्याच्या समस्येबद्दल विचारतो. यासोबतच तू का रडतोयस हे विचारायलाही तो विसरत नाही.. त्या मुलानंतर आणखी काही गरजू त्याच्यासमोर आपल्या समस्या सांगताना दिसतात. सोनूही साऱ्यांच्या समस्या शांतपणे ऐकून घेताना दिसतो.

अलीकडेच एका व्यक्तीने आपल्या भावाच्या हृदयाच्या उपचारांसाठी ५ ते ६ लाख रुपयांची मागणी केली होती, त्यास उत्तर म्हणून सोनू सूद यांनी लिहिले होते की, हृदयाची गोष्ट आहे म्हटल्यावर करावं तर लागेलच.. उद्याची अपॉइण्टमेन्ट निश्चित करण्यात आली आहे.

सोनू सूदची ही शैली पाहून त्याच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. लोक देवाप्रमाणे त्याची उपासना करू लागले आहेत. लोक सतत प्रेम व्यक्त करतात, त्याच्याबद्दल आदर व्यक्त करतात आणि त्याच्या शैलीला सलाम करतात.





Source link

- Advertisement -