Video: नेमारचे अफलातून ड्रिबलिंग आणि लुकासचा विजयी गोल; ब्राझील कोपा अमेरिकेच्या फायनलमध्ये

Video: नेमारचे अफलातून ड्रिबलिंग आणि लुकासचा विजयी गोल; ब्राझील कोपा अमेरिकेच्या फायनलमध्ये
- Advertisement -

रिओ दी जानेरो: ब्राझीलने दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असलेल्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. गतविजेत्या ब्राझीलने सेमीफायनलमध्ये पेरूचा १-०ने पराभव केला. रंगतदार झालेल्या सामन्यात ब्राझीलने पहिल्या हाफमध्ये १-० ने आघाडी घेतली होती. हा गोल लुकास पकॅटाने ३५व्या मिनिटाला मारला होता. यासाठी नेमार ज्युनिअरने मदत केली.

वाचा- इंग्लंड क्रिकेट संघाला बसाल मोठा धक्का; ७ जणांना करोनाची लागण

सामन्यातील दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही आणि ब्राझीलने अंतिम फेरीचे तिकिट मिळवले. या सामन्यात दोन्ही संघांना प्रत्येकी ३ कॉर्नर मिळाले होते.

वाचा- आनंदाची बातमी; इंग्लंड-भारत कसोटी मालिकेत प्रेक्षकांना मिळणार खास गिफ्ट

वाचा- वनडे सुपर लीग गुणतक्ता: भारताच्या पुढे बांगलादेश, अफगाणिस्तान

वाचा- भुवी आणि कंपनीने धवन इलेव्हनची दाणादाण उडवली, पाहा व्हिडिओ

स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल बुधवारी सकाळी होणार आहे. ही लढत सुपरस्टार लियोनेल मेसीच्या अर्जेंटिना विरुद्ध कोलंबो यांच्यात असेल. विजेत्या संघाची ११ जुलै रोजी ब्राझीलविरुद्ध अंतिम फेरीत लढत होईल. तर पराभूत होणाऱ्या संघ पेरुविरुद्ध १० जुलै रोजी तिसऱ्या क्रमांकासाठी खेळेल.

वाचा- Video: मेसीची अफलातून फ्री किक; अर्जेंटीना उपांत्य फेरीत

वाचा- युरो कप: अंतिम फेरी कोण गाठणार? इटली विरुद्ध स्पेन लढत

कोपा अमेरिका स्पर्धेचे सर्वाधिक ९ विजेतेपद अर्जेंटिनाने मिळवले आहेत. त्यानंतर उरुग्वे आणि चिली यांचा क्रमांक लागतो, या दोन्ही संघांनी प्रत्येकी सात वेळा जेतेपद मिळवले आहे. ब्राझील आणि पेरू यांनी प्रत्येकी सात वेळा विजेतेपद मिळवले आहे. गेल्या वेळी (२०१९) मध्ये अंतिम सामन्यात ब्राझीलने पेरूचा ३-१ असा पराभव केला होता. या वर्षी ब्राझीलला सातव्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी आहे.

वाचा- सामना झाल्यानंतर पाहा मैदानावर काय केले; व्हिडिओ झाला व्हायरल

Source link

- Advertisement -