मेसीला आता विक्रमही खुणावतो आहे. दक्षिण अमेरिकेतून सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत पेले यांच्यासह संयुक्त अव्वल होण्याची संधी मेसीला आहे. पेले यांच्या गोलशी बरोबरी करण्यासाठी मेसीला एका गोलने मागे आहे. आणखी एक गोष्ट मेसीसाठी खास आहे अन् ती म्हणजे या विजयासह मेसीने आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनेही आणखी एक पाऊल टाकले आहे. आपल्या अर्जेंटिना संघासाठी त्याला मानाची ट्रॉफी जिंकायची आहे. अन् या विजयामुळे त्याचे हे स्वप्न जीवंत आहे.
वाचा- ‘टी-२० वर्ल्डकपमध्ये पराभव झाल्यास विराटच्या जागी मुंबईचा खेळाडू कर्णधारपदाचा दावेदार’
गोइनिया येथील ऑलिम्पिको स्टेडियममध्ये पार पडलेल्या लढतीत रॉड्रिगो डी पॉलने ३९व्या मिनिटाला पहिला गोल केला, तर लॉटारो मार्टिनेजने ८४व्या मिनिटाला दुसरा गोल तडकावला. अलीकडेच बार्सिलोनासह मेसीचा करार संपुष्टात आला आहे. मेसीने या दोनही गोलमध्ये सहाय्यक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. मेसीने लढतीच्या अखेरच्या काही मिनिटांमध्ये फ्री किकवर अर्जेंटिनाचा तिसरा गोल केला. हा मेसीचा यंदाच्या कोपा स्पर्धेतील एकूण चौथा गोल ठरला आहे. अर्जेंटिनाला आणखी मोठ्या फरकाने लढत जिंकता आली असती; पण त्यांनी गोल करण्याच्या संधी गमावल्या. कोलंबियाविरुद्धच्या लढतीत त्यांना या चुका प्रकर्षाने टाळाव्या लागणार आहेत.
वाचा- कर्णधार मिताली राजने केला वर्ल्ड रेकॉर्ड; भारताचा इंग्लंडवर शानदार विजय
मेसीने केलेला गोल हा फ्रीकिकवर होता. या स्पर्धेत मेसीने फ्री-किकवर मारलेला हा दुसरा गोल आहे. याआधी त्याने चिलीविरुद्ध सलामीच्या सामनन्यात फ्री-किकवर गोल मारला होता. मेसीच्या करिअरमध्ये फ्री-किकवर मारलेला हा ५८वा गोल होता. अर्जेंटीनाचा माजी कर्णधार डिएगो मॅरेडोना यांनी अशा पद्धतीने ६२ गोल केले आहेत. तर पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्टियानो रोनाल्डोने आतापर्यंत फ्री-किकवर ५६ गोल केले आहेत.