हायलाइट्स:
- राहुल आणि दिशाला शुभेच्छा द्यायला आले हे पाहुणे
- नवदाम्पत्याने या खास पाहुण्यांचे उत्साहात केले स्वागत
- खास पाहुण्यांनी शुभेच्छा देत नवदाम्पत्याची काढली दृष्ट
राहुल वैद्यच्या घरी बुधवारी सकाळी किन्नर मंडळी हजर झाली. राहुल आणि दिशाने या किन्नर मंडळींचे स्वागत केले. किन्नर मंडळींचे या दोघांनी आपलेपणाने स्वागत केल्यामुळे ते सर्वजण खूष झाले. यावेळी दिशा आणि राहुल नाईट सूटमध्ये होते. तर दिशाच्या डोक्यावर लाल ओढणी होती. किन्नरांनी या दोघांची दृष्ट काढली आणि नवदाम्पत्याला भरभरून आशीर्वाद दिला. इतकेच नाही तर त्यांनी या दोघांसोबत डान्सही केला. त्यानंतर शगून म्हणून राहूलकडून चक्क १.५ लाख रुपये आणि सोन्याची भेटवस्तू मागितली.
राहुल आणि दिशा सध्या एकमेकांसोबत आणि आपल्या कुटंबासोबत क्वालिटी टाईम घालवत आहेत. या दोघांच्या लग्नाला २३ जुलै रोजी एक आठवडा पूर्ण झाला. त्याचे सेलिब्रेशन म्हणून या दोघांनी केक कापला होता. सध्या हे दोघे आपल्या कुटुंबांतील सदस्यांप्रमाणेच मित्रमंडळींसोबत धम्माल करत आहेत. अलिकडेच त्यांनी अभिनेता अर्जुन बिजलानी आणि त्याच्या बायकोसोबत पार्टी केली होती.