राहुल आणि दिशाचं लग्न मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये पार पडलं. व्हिडिओमध्ये राहुल आणि दिशा नववधू आणि वराप्रमाणे सजलेले आहेत. दिशाने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे तर राहुलनेही त्याला साजेसा पेहराव केला आहे. डोक्यावरील फेट्यात राहुल एखाद्या राजकुमाराप्रमाणे दिसत आहे. व्हिडिओमध्ये आधी दिशा राहुलला अंगठी घालताना दिसत आहे. त्यानंतर राहुल गुडघ्यावर बसून दिशाच्या बोटात अंगठी घालतो. राहुलचा हा अंदाज चाहत्यांना प्रचंड पसंत पडत आहे. त्यानंतर ते दोघे एकमेकांना हार घालताना दिसत आहेत. तर त्यांचे कुटुंबीय दिशा आणि राहुलवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत आहेत.
राहुल दिशाच्या लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. राहुल आणि दिशाचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. इतर कलाकारही राहुल आणि दिशाला त्यांच्या लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. यापूर्वी राहुल आणि दिशाच्या हळद आणि मेहंदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते. राहुल आणि दिशाने त्यांच्या कुटुंबासोबत या सोहळ्याचा आनंद घेतला. आता चाहत्यांना राहुल आणि दिशाच्या रिसेप्शनची उत्सुकता लागून राहिली आहे.