सामन्यात १५व्या मिनिटाला बॉल पोर्तुगालच्या ताब्यात आला. तेव्हा रोनाल्डो पोर्तुगालच्या डिफेस बॉक्समध्ये होता. त्याने बॉल डिएगो जोटाकडे दिला. डिएगोने चेंडू वेगाने जर्मनीच्या गोल पोस्टकडे नेला. त्याच वेळी रोनाल्डोने १४ सेंकदात ९२ मीटर अंतर पार केले. जेव्हा रोनाल्डो गोल पोस्टजवळ आला तेव्हा डिएगोने त्याला पास दिला आणि जर्मनीच्या खेळाडूंना चकवा देत रोनाल्डोने शानदार गोल केला.
हा गोल करताना रोनाल्डोचा धावण्याचा वेग ३२ किलोमीटर प्रती तास इतका होता. त्याने केलेल्या या गोलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
वाचा- न्यूझीलंडच्या काइलचा कहर; भारताचा २१७वर ऑलआउट
रोनाल्डोने जर्मनीविरुद्ध आतापर्यंत ५ सामने खेळले आहे. त्याचा जर्मनीविरुद्धचा हा पहिला गोल ठरला. तो जर्मनीविरुद्ध ४५० हून अधिक मिनिटे मैदानावर खेळला असून गोलसाठी २५ हून अधिक वेळा प्रयत्न केले आहेत. रोनाल्डोने फ्रान्स विरुद्ध सहा सामन्यात गोल केले नव्हते.
वाचा- अंपायरने घातला गोंधळ, विराट कोहली भडकला; जाणून घ्या
युरो कपमधील रोनाल्डोचा तिसरा तर आतापर्यंतच्या स्पर्धेतील १२वा गोल ठरला. तो ५वी युरो कप स्पर्धा खेळत आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच खेळाडू आहे. रोनाल्डोच्या नावावर आंतरराष्ट्रीय सामन्यात १०७ गोल आहेत. तो इराणच्या अली डेईच्या १०९ गोलपासून फक्त २ गोल दूर आहे. याआधी हंगेरी विरुद्धच्या सामन्यात त्याने २ गोल केले होते.
वाचा- WTC Final: जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू ज्याने ICCच्या सर्व फायनल मॅच खेळल्या
जर्मनीविरुद्धच्या सामन्यात पोर्तुगालच्या राफेल गुरेरो आणि रुबेन डियास यांनी दोन आत्मघाती गोल केले. २००० सालानंतर पोर्तुगालला जर्मनीचा कधीच पराभव करता आला नाही. या काळात दोन्ही संघात पाच सामने झाले असून ते सर्व जर्मनीने जिंकले आहेत.