हायलाइट्स:
- सोशल मीडियावर चर्चेत आहे कंगना रणौतची छोटी चाहती
- आपल्या छोट्या चाहतीचे फोटो आणि व्हिडीओ पाहून कंगनाही झाली इम्प्रेस
- सोशल मीडियावर पोस्ट करत कंगनानं केलं चाहतीचं कौतुक
कंगना रणौतच्या चाहत्यांमध्ये एक छोटी मुलगी देखील तिची चाहती आहे. जिचं इन्स्टाग्रामवर अकाउंट देखील ‘छोटी कंगना‘ या नावानं आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या चिमुकल्या चाहतीनं कंगनाचे लुक कॉपी करून त्याचे कोलाज फोटो शेअर केले आहेत. याशिवाय कंगनाचा अभिनय करतानाचे तिचे काही व्हिडीओ देखील तिनं शेअर केले आहेत. कंगनाच्या या छोट्या चाहतीचं टॅलेंट पाहून सर्वच हैराण झाले आहेत.
सोशल मीडियावर कंगनाच्या या छोट्या चाहतीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. जे पाहून स्वतः कंगना रणौत सुद्धा इम्प्रेस झाली आणि तिच्यावर कमेंट करण्यापासून स्वतःला थांबवू शकली नाही. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या मुलीचा व्हिडीओ शेअर करत कंगनानं लिहिलं, ‘ओय छोटी, तू अभ्यास वगैरे करतेस की नाही की पूर्ण दिवस हेच सर्व करत असतेस.’
कंगना रणौतच्या कामाबद्दल बोलायचं तर तिच्याकडे सध्या अनेक चित्रपट आहे. यापैकी काही चित्रपटांचं शूटिंग पूर्ण झालंय, काहींच चालू आहे, तर काही चित्रपटांचं शूटिंग आगामी काळात सुरू होणार आहे. कंगनाकडे सध्या तमिळनाडूच्या दिवंगत पंतप्रधान जे. जयललिता यांचा बायोपिक ‘थलायवी’, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा बायोपिक, ‘धाकड’, ‘तेजस’ असे अनेक चित्रपट आहेत.