Home बातम्या आंतरराष्ट्रीय west bengal violence : ‘लक्षात ठेवा, मुख्यमंत्री आणि TMC नेत्यांनाही दिल्लीत यावं लागतं’

west bengal violence : ‘लक्षात ठेवा, मुख्यमंत्री आणि TMC नेत्यांनाही दिल्लीत यावं लागतं’

0
west bengal violence : ‘लक्षात ठेवा, मुख्यमंत्री आणि TMC नेत्यांनाही दिल्लीत यावं लागतं’

[ad_1]

कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल ( west bengal election result ) लागताच राजकीय हिंसाचार ( violence in bengal ) उफाळून आला आहे. विधानसभा निवडणूक निकालाच्या दिवशीच कोलकात्यात भाजपच्या कार्यालयात आग लावण्यात आली होती. सोमवारीही दोन कार्यकर्त्यांची बेदम मारहाण करून हत्या करण्याचं आल्याचं सांगण्यात येतंय. यादरम्यान, पश्चिम दिल्लीचे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार परवेश साहिब सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनाही दिल्लीला यावं लागतं. हे विसरू नका, असा इशारा त्यांनी दिला आहे.

निवडणूक जिंकल्यानंतर TMC च्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांची हत्या केली आहे. कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्या आहेत. हल्लेखोर कार्यकर्त्यांची घरं पेटवत आहेत. TMC चे खासदार, मुख्यमंत्री आणि आमदारांनाही दिल्लीत यावं लागतं. या इशारा समजा. निवडणुकीत हार-जीत होत असते. पण हत्या नाही, असं परवेश साहिब सिंह म्हणाले.

उत्तराखंडमधील भाजप खासदार अनिल बलुनी यांनीही तृणमूल काँग्रेसवर (TMC) हल्लाबोल केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( mamata banerjee ) यांचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराही ही स्क्रिप्ट आधीच लिहिण्यात आली होती. केंद्रीय सुरक्षा दल निघून जातील. मग तुम्हाला कोण वाचवणार? असं ममता बॅनर्जी स्वतः मार्च महिन्यात म्हणाल्या होत्या. म्हणजेच बंगालमध्ये हिंसाचाराचा जो खेळ सुरू आहे, तो TMC ने आधीच ठरवला होता. लज्जास्पद!, असं बलुनी म्हणाले.

ममतांच्या सूचनेवरून हल्ले सुरू, भाजपचा आरोप

विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांवरून केंद्रीय गृहमंत्रालयाने बंगाल सरकारकडून अहवाल मागितला आहे. तर भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ले हे ममता बॅनर्जींच्या सूचनेवरून होत असल्याचा आरोप, भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी केला आहे.

मजुराची पत्नी ते आमदार… भाजपच्या चंदना बाऊरी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा बंगालला जाणार

पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांवरील होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे मंगळवारपासून दोन दिवसांच्या बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत. हिंसाचारग्रस्त भाजप कार्यकर्त्ये आणि त्यांच्या नातलगांची भेट घेतील. गेल्या २४ तासांत टीएमसीच्या गुंडांनी बंगालमध्ये ९ कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप विजयवर्गीय यांनी केला आहे. दरम्यान, जे.पी. नड्डा हे कोलकात्यात धरणे आंदोलनही करणार आहेत.

Assembly Elections 2021: तृणमूल काँग्रेसच्या ‘दिवंगत’ उमेदवारानं जिंकली विधानसभा निवडणूक!

[ad_2]

Source link