Home ताज्या बातम्या will uddhav and raj come togather?: उद्धव-राज एकत्र येण्याची शक्यता आहे का?; अरविंद सावंत म्हणाले…

will uddhav and raj come togather?: उद्धव-राज एकत्र येण्याची शक्यता आहे का?; अरविंद सावंत म्हणाले…

0
will uddhav and raj come togather?: उद्धव-राज एकत्र येण्याची शक्यता आहे का?; अरविंद सावंत म्हणाले…

हायलाइट्स:

  • राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, हा प्रश्न राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय बनू लागला आहे.
  • निवडणूक होण्यापूर्वी किंवा मग निवडणूक पार पडल्यानंतर अशी चर्चा होतच असते, असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले.
  • आता या प्रश्नावर फक्त शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच बालू शकतील- अरविंद सावंत.

मुंबई: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, हा प्रश्न राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय बनू लागला आहे. एका मुलाखतीत याबाबत प्रश्न विचारल्यानंतर उत्तरादाखल राज ठाकरे यांनी आकाशाकडे बोट दाखवले होते. त्यानंतर ही चर्चा सुरू झाली. यावर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही मूक भाष्य केले आहे. आकाशाकडे बोट दाखवत खासदार अरविंद सावंत म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबतची चर्चा फक्त प्रसारमाध्यमांमध्येच सुरू आहे. निवडणूक होण्यापूर्वी किंवा मग निवडणूक पार पडल्यानंतर अशी चर्चा होतच असते, असे सावंत म्हणाले. (shiv sena mp arvind sawant answers on will uddhva thackeray and raj thackeray will come togather)

शिवसेना खासदार अरविंद सावंत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलत होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का हा प्रश्न आपल्याला आशावादी वाटत नसल्याचे सांगत त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली. आता राज ठाकरे यांना असा प्रश्न का विचारण्यात आला आणि राज ठाकरे यांनी तसे उत्तर का दिले याबाबत आपल्याला माहीत नसल्याचे सांगत या प्रश्नाबाबत त्यांनी संदिग्धता व्यक्त केली. आता या प्रश्नावर फक्त शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच बालू शकतील असे स्पष्ट करत त्यांनी या मुद्द्यांला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाजकारणात आण राजकारणात काहीही घडू शकते हे बोलायलायही सावंत विसरले नाहीत.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा तशी नवीन नाही. अशी चर्चा यापूर्वीही अनेकदा झालेली आहे. या चर्चेला निवडणुकीची पार्श्वभूमी असते. आता मात्र प्रसारमाध्यमात ही चर्चा होत आहे, मात्र सगळ्या गोष्टी या भविष्यात पाहिल्या जातील असेही सावंत पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- अँटिलिया स्फोटके प्रकरण: पोलिस निरीक्षक सुनील माने पोलिस दलातून बडतर्फ

‘विरोधकांना राऊत यांचे मार्मिक बाण टोचतात’

यावेळी राऊत यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. संजय राऊत यांची अवस्था ना घर का ना घाटका अशी झाली आहे आणि आता ते सामनाचे संपादकही नाहीत असे फडणवीस म्हणाले होते. त्यावर सावंत म्हणाले की, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना संजय राऊत संपादक नव्हते. बाळासाहेब हेच सामनाचे संपादक होते. राऊत याच्या लेखणीतून बाळासाहेबांचे विचार आणि त्यांचे संस्कार उतरत असतात. ती बाळासाहेबांचीच भाषा असते. याच कारणामुळे विरोधकांना राऊतांचे मार्मिक बाण टोचत असतात, असे सावंत म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- आशीष शेलार यांनी शिवसेनेवर केला ‘हा’ गंभीर आरोप, म्हणाले…
क्लिक करा आणि वाचा- भाजपची समांतर चाल? मराठा आंदोलनाचे नेतृत्व विखे पाटलांकडे

Source link