Home क्रीडा WORLD RECORD : रोहित शर्माने द. आफ्रिकेचे वाजवले तीन’तेरा’; वासिम अक्रमचा २३ वर्षं जुना विक्रम मोडला!

WORLD RECORD : रोहित शर्माने द. आफ्रिकेचे वाजवले तीन’तेरा’; वासिम अक्रमचा २३ वर्षं जुना विक्रम मोडला!

0

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रोहित शर्मानं दुसऱ्या डावातही शतकी खेळी करून इतिहास घडवला. सलामीवीर म्हणून एकाच कसोटीच्या दोन्ही डावात शतक करणारा सहा भारतीय फलंदाज ठरला. पण, प्रथमच सलामीला येत पहिल्याच सामन्यात अशी कामगिरी करणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान त्यानं पटकावला. रोहितनं पहिल्या डावात 176 धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या डावात त्यानं शतकी खेळी साकारली आहे. कसोटी क्रिकेटमधील रोहितचे हे पाचवे शतक आहे. सलामीवीर म्हणून त्याचे हे दुसरे आणि आफ्रिकेविरुद्धचेही दुसरे शतक आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना त्यानं तीन शतकं केली आहेत. रोहितची ही विक्रमी खेळी केशव महाराजाने संपुष्टात आणली. त्यानं रोहितला यष्टिचीत केले. रोहितनं 149 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकार खेचून 127 धावांची खेळी केली. या कामगिरीसह त्यानं विश्वविक्रमाला गवसणी घातली. रोहितनं पहिल्या डावात 244 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकार खेचून 176 धावांची खेळी केली होती. त्याने दोन्ही डावांत मिळून एकूण 303 धावा केल्या आणि त्यात 33 चौकार व 13 षटकारांचा समावेश आहे. एकाच कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. ही विक्रमी कामगिरी करताना त्यानं  पाकिस्तानच्या वासीम अक्रमचा 1996 सालचा विक्रम मोडला. अक्रमने झिम्बाब्वेविरुद्ध 12 षटकार खेचले होते. मॅथ्यू हेडन, नॅथन अॅस्टेल, ब्रेंडन मॅकलम ( दोन वेळा) आणि बेन स्टोक्स यांनी एका कसोटीत 11 षटकार खेचले आहेत. 

रोहितचा ‘हिट’ शो; सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात केला भीमपराक्रम
सलामीवीर म्हणून एकाच सामन्यात दोन्ही डावांत सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. त्यांनी तीन वेळा अशी कामगिरी केली आहे. त्यानंतर राहुल द्रविड (2),  रोहित ( 1), विराट कोहली ( 1), अजिंक्य रहाणे ( 1) आणि विजय हझारे ( 1) यांचा क्रमांक येतो. 


रोहितनं ‘दी वॉल’ ओलांडली, भारतात कुणाला न जमलेली कामगिरी केली
रोहितनं एका कसोटीत सर्वाधिक 9 षटकार खेचणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला. त्यानं नवज्योत सिंग सिद्धूचा 1994 सालचा 8 षटकारांचा विक्रम आज मोडला. भारताकडून तीनही फॉरमॅटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम रोहितच्या नावावर झाला आहे. रोहितनं वन डेत 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16, तर ट्वेंटी-20त 2017मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 षटकार खेचले आहेत.  

रोहित शर्माचं दे दणादण; वन डे, ट्वेंटी-20 अन् आता कसोटीत पराक्रम 
एका कसोटीत सर्वाधिक 9 षटकार खेचणारा रोहित हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. त्यानं नवज्योत सिंग सिद्धूचा 1994 सालचा 8 षटकारांचा विक्रम आज मोडला. भारताकडून तीनही फॉरमॅटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम रोहितच्या नावावर झाला आहे. रोहितनं वन डेत 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16, तर ट्वेंटी-20त 2017मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 षटकार खेचले आहेत.