दारूच्या बाटल्यांचा हार घालून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्याचा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाई यांना त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी घेतले ताब्यात

- Advertisement -

दारूच्या बाटल्यांचा हार घालून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्याचा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाई यांना त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी घेतले ताब्यात

दारूमुक्त महाराष्ट्र’ च्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दारूच्या बाटल्याचा हार घालण्याचा इशारा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई याना आज, शनिवारी त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतेले.

आज, शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने पुण्यात येणार आहेत. या यात्रेदरम्यान ‘दारूमुक्त महाराष्ट्र’ च्या मागणीसाठी दारूच्या बाटल्यांचा हार घालून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता. त्यामुळे सहकारनगर पोलिसांनी तृप्ती देसाई यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यांना सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले.

- Advertisement -