काजोल आणि शाहरुखच्या एवढ्या साऱ्या चित्रपटांनंतर दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या एवढी पसंतीस आली होती की, हे दोघं एकमेकांशी लग्न करतील असं त्यांना वाटत होतं. पण नंतर शाहरुख खाननं गौरीशी लग्न केलं आणि काजोलनं अजय देवगणशी लग्न केलं. पण जेव्हा एका चाहत्यानं काजोलला ‘अजय देवगण तुझा पती नसता तर शाहरुखशी लग्न केलं असतं का?’ असा प्रश्न विचारला तेव्हा तिनं खूपच मजेशीर आणि भन्नाट असं उत्तर दिलं.
एका चाहत्यानं एका इन्स्टाग्राम सेशनमध्ये काजोलला ‘अजय देवगण तुझा पती नसता तर शाहरुखशी लग्न केलं असतं का?’ असा प्रश्न विचारला होता. ज्याचं काजोलनंही मजेदार अंदाजात उत्तर दिलं होतं. चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना काजोलनं लिहिलं, ‘पण त्यानं प्रपोज करायला नको का?’ काजोलच्या या प्रश्नावर युझर्सनी धम्माल प्रतिक्रिया दिल्या होत्या. काजोल नेहमीच तिच्या मजेदार अंदाजासाठी ओळखली जाते. याशिवाय याबाबत शाहरुखला अनेकदा हा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावर त्यानं आम्ही फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहोत. त्यापेक्षा जास्त काहीच नाही.
काजोल आणि अजय देवगणनं १९९९ साली लग्न केलं होतं. या दोघांना न्यासा आणि युग अशी दोन मुलं सुद्धा आहे. एकीकडे शाहरुख आणि काजोल यांनी सुपरहिट चित्रपट दिले असले तरीही अजय आणि काजोलची जोडीसुद्धा सुपरहिट ठरली होती. या दोघांनी ‘यू मी और हम’, ‘राजू चाचा’, ‘तान्हाजी’ यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे.
- Advertisement -