हायलाइट्स:
- अथया शेट्टी आणि केएल राहुल यांचे नाते सुनील शेट्टीला मान्य?
- अथया आणि राहुलच्या जोडीवर सुनीलने व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
- अथया आणि राहुल रिलेशनमध्ये असल्याची जोरदार चर्चा
गेल्या महिन्यात राहुल इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी गेला. तेव्हा राहुलने काही ऑफिशिअल कागदपत्रांमध्ये पार्टनर म्हणून अथिया शेट्टीचे नाव लिहिले होते. नियमांनुसार कोणत्याही क्रिकेटपटूला बाहेर जाताना आपल्या पत्नीचे अथवा पार्टनरचे नाव सांगणे बंधनकारक असते. राहुलने तिथे अथयाचे नाव लिहिले. त्यामुळे या दोघांचे रिलेशन देखील ऑफिशिअल झाले आहे. पाठोपाठ आता सुनीलने देखील त्याचे सकारात्मक मत व्यक्त केल्यामुळे या दोघांच्या नात्यावर पसंतीची मोहोर उमटवली आहे.
काय म्हणाले सुनील शेट्टी
सुनील शेट्टी यांनी बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘अथिया सध्या इंग्लंडमध्ये आहे. परंतु ती तिचा भाऊ अहानसोबत आहे. ते दोघे सुट्ट्या घालवण्यासाठी तिकडे गेले आहेत. बाकी जे काही असेल ते तुम्ही ती आल्यावर तिलाच विचारा.’ या मुलाखतीवेळी सुनील यांना अथिया आणि राहुलच्या रिलेशनबद्दल विचारले असता ते म्हणाले की, ‘हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारला तर अधिक उत्तम होईल. हे दोघे एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या जाहिरातीमध्ये काम करत आहेत. त्या कंपनीने या दोघांना एकत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला असे वाटते की ते दोघे एकत्र चांगले दिसतात. एखाद्या छान जोडप्याप्रमाणेच ते दिसतात ना?’ त्यानंतर सुनीलने पुढे हसून सांगितले, ‘जाहिरातीमध्ये हे दोघेजण एकत्र छान दिसतात असे मला वाटते.’
दरम्यान, याआधी अनेकदा केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी एकत्र फोटो शेअर केले आहेत. अलिकडेच सुनील शेट्टीने देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये राहुल आणि अहान शेट्टी एकत्र दिसत होते. केएल राहुल हा सुनीलचा सर्वात आवडता क्रिकेटपटू आहे.