हायलाइट्स:
- राज्यातील अनलॉकडाउनच्या गोंधळावरून भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
- अंधेर नगरी, चौपट राजा असा टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारला लगावला आहे.
- राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाच टप्प्यात राज्यात अनलॉक केले जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सरकारने मात्र राज्यातील निर्बंध उठवण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट केले.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत हा निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार या राज्याची अवस्था अंधेर नगरी, चौपट राजा अशी करत आहे. कोणाचा कोणाशी ताळमेळ नाही. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार पत्रकार परिषद घेऊन अनलॉकडाउन केल्याची घोषणा करतात. हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाल्याचे सांगतात. काही वेळानंतर मात्र सरकारचे निवेदन येते आणि अनलॉकडाउनचा प्रस्ताव असून निर्णय झालेला नाही, असे सरकार स्पष्ट करते, असे उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्य सरकारने तातडीने निर्बंध उठवण्यात आलेले नसल्याचे जाहीर केले. करोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थांबलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढतोच आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल, असे मांडतानाच राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- … तर ओबीसी आरक्षणाला हात लावण्याची सरकारची हिम्मत झाली नसती: देवेंद्र फडणवीस
वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यात पाच टप्प्यांत अनलॉक केले जाणार असल्याचे जाहीर केले होते. पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेड्सची उपलब्धता या आधारावर जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यामुळे हे जिल्हे पाच टप्प्यांत लॉकडाऊनमुक्त होतील, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले होते.
क्लिक करा आणि वाचा- ‘माझा मोबाईल, माझी जबाबदारी’; मनसेचा महापौर पेडणेकर यांना टोला
वडेट्टीवार यांनी माहिती देताना सांगितले होते की, पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे अनलॉक होतील. दुसऱ्या टप्प्यात सहा, तिसऱ्या टप्प्यात १० आणि चौथ्या टप्प्यात दोन जिल्हे अनलॉक होतील. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली आहे अशा जिल्ह्यात उद्यापासून
लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्यात येत असल्याचे ते म्हणाले होते. मात्र असा निर्णय झाला नसल्याचे सरकारने जाहीर केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- पोलिसांनी दारु पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून तरुणाने कापला हात