अभिनेता चंकी पांडेची आई स्नेहलता यांचं मुंबईत निधन, अनेक सेलिब्रिटींनी घेतलं अत्यंदर्शन

अभिनेता चंकी पांडेची आई स्नेहलता यांचं मुंबईत निधन, अनेक सेलिब्रिटींनी घेतलं अत्यंदर्शन
- Advertisement -


हायलाइट्स:

  • अभिनेता चंकी पांडेच्या आईचे निधन
  • निधनाचे वृत्त कळताच अनेक कलाकारांनी चंकी यांचे भेटून केले सांत्वन
  • चंकीची मुलगी अनन्या पांडे कामाच्या निमित्ताने मुंबई बाहेर

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडे यांच्या आईचे स्नेहलता पांडे यांचे शनिवारी मुंबईतील त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेले. चंकी आणि त्यांच्या आईमध्ये खूप छान बाँडिंग होते. आईच्या निधनामुळे चंकी यांना अतीव दुःख झाले आहे.

चंकी यांच्या आईचे निधन नेमके कोणत्या कारणाने झाले, याचा तपशील अद्याप मिळालेला नाही. दरम्यान, चंकी आणि त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आणि त्याच्या आईचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार गेले. चंकी पांडे आणि भावना पांडे यांच्या जवळचे असलेले अभिनेता समीर सोनी आणि अभिनेत्री नीलम हे पांडे हाऊसमध्ये गेले होते.


अनन्या पांडे आजीची लाडकी

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे ही आजीची खूपच लाडकी होती. अनन्याने आजीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्यासोबत डान्स करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अनन्याने तिच्या आजीसोबत ‘स्टुटंडस ऑफ द इयर २’ या सिनेमातील ‘जवानी’ गाण्यावर डान्स केला होता.

नुकत्याच झालेल्या मदर्स डेच्या निमित्ताने चंकी पांडे यांनी आपल्या आईसोबतचा जुना फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत लिहिले होते, ‘कायम आईचा लाडका मुलगा… १९८८ मध्ये आलेल्या गुन्हाओं का फासला या सिनेमाच्या सेटवरचा आईसोबतचा हा फोटो.’


दरम्यान, चंकी पांडे यांचे मित्रमंडळी स्नेहलता पांडे यांचे अत्यंदर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले. यात कुटुंबासोबत सिनेसृष्टीतील काही जवळच्या मित्र- मैत्रिणींचाही समावेश आहे. सध्या चंकीची मुलगी अनन्या पांडे कामानिमित्ताने मुंबई बाहेर आहे.





Source link

- Advertisement -