त्यामुळे आता माझी जबाबदारी खूप वाढली आहे. पूर्वी त्याच वाहिनीवर काम केलं असल्यानं सेटवर आजूबाजूला अनेक ओळखीचे चेहरे आहेत. सकारात्मक वातावरणात काम सुरू आहे.’
प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. प्रेमाचे अनेक रंग असतात कधी आनंदी – सुखकर असतात, आल्हाददायक असतात तर कधी प्रेमाला रांगडा बाज असतो. कारण ते पहिल्या नजरेत जुळलेलं किंवा फुलू लागलेलं प्रेम असेलच असं नाही. काहीवेळा प्रेमाची परिभाषा कळायला काही काळ जावा लागतो. ज्या व्यक्तीसोबत आपले विचार जुळत नाहीत, भांडणं होतात त्या व्यक्तीवर प्रेम जडू शकत नाही असं काही नसतं, त्या प्रेमाची जाणीव मात्र जरा उशिरा होते. जसं अग्नी आणि पाणी कधीच एकत्र येऊ शकत नाही पण त्यांनी सोबत असण गरजेचं असतं म्हणजेच एकमेकांवर हावी होत नाही. अगदी तसंच आयुष्याचाही समतोल साधायचा असेल तर असे दोन परस्परविरुध्द, भिन्न स्वभावाची व्यक्तिमत्त्वं एकत्र असणं हीदेखील सहजीवनाची गरज असते.
हाच वेगळेपणा त्यांच्या प्रेमात एक रांगडा बाज घेऊन येतो, मग अशा प्रेमाला व्यक्त व्हायला शब्द देखील अपुरे पडतात. हाच अबोल प्रेमाचा रांगडा बाज घेऊन येत आहेत अंतरा आणि मल्हार. जी व्यक्ती समोर आली तरी नकोशी वाटते, जिच्याबद्दल मनामध्ये पराकोटीचा तिरस्कार आहे अशात तिच्यासोबतच जर साता जन्माच्या गाठी जुळल्या तर… असा कुठला नात्यांचा गुंता उद्भवतो ज्यामुळे अंतराबद्दल मनात द्वेष असलेला मल्हार लग्नासाठी तयार होतो. हे पाहण्यासाठी ‘जीव माझा गुंतला‘ ही नव्याने येऊ घातलेली मालिका २१ जूनपासून कलर्स मराठीवर रात्री ९.३० वाजता पाहता येईल.