Home मनोरंजन अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार, इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार, इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

0
अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार, इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

[ad_1]

हायलाइट्स:

  • अभिनेत्री प्राजक्ता माळीने मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार
  • सोशल मीडियावर चर्चेत आहे प्राजक्ता माळीची इन्स्टाग्राम पोस्ट
  • प्राजक्तानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो

मुंबई: टीव्ही मालिकेतून मराठी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. अनेकदा ती तिचे फोटो आणि आगमी प्रोजेक्टचे अपडेट तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसते. प्राजक्ताच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकदा व्हायरलही होतात. आताही असंच काहीसं घडलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीन इन्स्टाग्रामवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीचे काही फोटो शेअर करताना त्यांचे आभार मानले आहेत. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

प्राजक्ता माळी मागच्या काही काळापासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमनं नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ज्याचे फोटो प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तिचे हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.


इन्स्टाग्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे फोटो शेअर करताना प्राजक्तानं लिहिलं, ‘ग्रेट भेट! मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली. तिही ‘वर्षा’वर. काल साहेबांच्या हस्ते हास्यजत्रेच्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. धन्यावाद मुळ्ये काका. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब; व्यस्त वेळापत्रकातून सबंध १ तास आम्हाला दिल्याबद्दल, मनापासून कौतुक करून उत्साह वाढविल्याबद्दल पुनःश्च धन्यवाद’ यासोबतच ‘आनंद पोटात माझ्या मायेना’ असा हॅशटॅगही तिनं वापरला आहे.


दरम्यान ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील ‘माझा पुरस्कारां’चं वितरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतंच झालं. यावेळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील कलाकारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. ‘माझा पुरस्कार’ सोहळ्याची १२ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं हे पुरस्कार वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच व्हावं, अशीच आपली इच्छा होती आणि ती आज पूर्ण होतेय, याचा विशेष आनंद आहे, असं अशोक मुळ्ये यांनी आवर्जून सांगितलं.


या कार्यक्रमात विशाखा सुभेदार, समीर चौघुले, सचिन मोटे, सचिन गोस्वामी, नम्रता संभेराव, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आदी कलाकारांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. ‘करोनाकाळात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यासारखा कार्यक्रम म्हणजे रामबाण लस आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलाकारांचं कौतुक केलं. कार्यक्रमातील कलाकारांनीदेखील या पुरस्काराबद्दल आभार मानले आहेत.



[ad_2]

Source link