अलिबाग दामिनेने घडवून आणली माय-लेकाची भेट

- Advertisement -

परवेज शेख अलिबाग दामिनेने घडवून आणली माय-लेकाची भेट….
अलिबाग परीसरात असलेल्या सुरुची हॉटेल समोर एक दिड वषार्चे मुल रडत असल्याची माहीती अलिबाग पोलिस ठाण्यातील दामिनी पथकाला मिळाली. दामिनी पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या दिड वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले. त्या मुलाच्या आईचा पत्ता शोधून काढला व त्यामुलाला आपल्या आईच्या ताब्यात दिले.


ओंकार कुमार (वय- 18 महिने) असे त्या बालकाचे नाव आहे . कुमार आपल्या वडीलांसमवेत फेरी मारण्यासाठी बाहेर पडला होता. मात्र कृष्णा कुमार यांनी अतिरीक्त अंमली पदार्थाचे सेवन केले होते. त्यांना दारू जास्त झाली असल्याने सुरुची हॉटेल आतील गल्लीत कृष्णा आपल्या 18 महीन्यांच्या मुलाला घेऊन पडला. जवळपास दिड तास हा मुलगा घटनास्थळी रडत होता. मात्र त्याच्या जवळ कोणी जात नव्हत. या सर्व परीस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत एका सुजान नागरीकाने अलिबाग पोलिस ठाण्याशी संपर्क साधला व त्यांना घडलेली घटना सांगितली.
दामिनी पथकाच्या ड्युटीवर असलेल्या महिला पलिस शिपाई सोनम कांबळे व अक्षता बानकर यांना ही घटना पोलिस ठाण्यातून समजल्या नंतर तात्काळ त्यांनी सदर ठिकाणी जावून बाळाला उचलुन घेतल मुलाला खाऊ देऊन शांत केले, मुलाचे वडील शुद्धीत नसल्याने आता पुढील आव्हान ओंकार च्या घरचा पत्ता शोधून काढणे होता. मात्र या दोन महीला पोलिसांनी हार न मानता ओंकारच्या घरचा पत्ता शोधून काढला. व त्याला त्याच्या आईच्या ताब्यात दिले.
ओंकार चे वडील कृष्णा कुमार याची चांगलीच कान उघडणी केली. लहान मलांना जबाबदारीने सांभाळायचे असते याची जाणीव ओंकारच्या आई बाबांना करून दिली.

- Advertisement -