अवघ्या १८ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने युवकाचा मृत्यु

- Advertisement -

बुलडाणा / मलकापूर ( दि 30 एप्रिल ) – मलकापूर शहर पोलिस स्टेशनचे पोहेकॉ  श्याम शिरसाट यांचे पुत्र रोहन यांच्यावर अचानक काळाने घाला घातला. २९ एप्रिल रोजी रात्री रोहन याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने अवघ्या १८ व्या वर्षी त्याचे निधन झाले. त्याच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
           पो.हे.कॉ. श्याम शिरसाट हे जनमानसात सर्वत्र परिचित असलेले  तसेच सर्वांच्या सुख-द:खात धावून जाणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे पुत्र रोहन याच्या झालेल्या निधनाचे वृत्त परिसरात कळताच समाजमन हेलावून गेले, अनेकांकडून शोकसंवेदनाही व्यक्त करण्यात आल्या. चि.रोहनच्या अकाली निधनाने शिरसाट परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रोहन याच्या पश्चात वडील, आई, एक भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे.

- Advertisement -