बुलडाणा,दि. 30 : कोरोनाच्या नावाने थरकाप उडालेला असताना बुलडाण्यात मात्र कोरोना मुक्तीचे दिलासादायक वृत्त येत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू ने हातपाय पसरले होते. सात तालुके कोरोना विषाणू ने आपल्या कवेत घेतले होते. परिणामी जिल्हा प्रशासन गंभीर होत सर्वत्र खळबळ उडाली. मात्र आज पुन्हा जिल्हा वासियांना दिलासादायक वृत्त मिळाले आहे.
जिल्ह्यात एकूण 24 कोरोनाबाधीत रूग्ण आहेत. त्यापैकी एक मृत आहे. यामध्ये बुलडाणा 9, चिखली 3, दे.राजा 2, सिं. राजा 1, मलकापूर 4, शेगांव 3 व चितोडा ता. खामगांव येथे 2 रूग्ण होते. अशाप्रकारे जिल्ह्यात 24 रूग्ण आहेत. त्यापैकी आतापर्यंत 17 रूग्णांना बरे झाल्याने रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामध्ये आज दोन रूग्णांची भर पडली असून ही संख्या 19 झाली आहे. सध्या कोविड रूग्णालयात 4 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.
प्रशासनाने कंटेन्टमेंट झोन, लॉकडाऊन पुर्णपणे बंदी, विहीत कालावधीत जिवनावश्यक वस्तुंचे दुकान उघडण्यास परवानगी आदी उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या मर्यादीत राहली आहे. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज दोन रूग्णांचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यांना आनंदाने जिल्हा आरोग्य प्रशासनाने निरोप दिला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णाचे स्वागत केले. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने मलकापूर येथील दोन रुग्णांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले व भविष्यासाठी चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना आजारावर मात केल्याने रूग्णांचा चेहरा आनंदीत होता.
या कोरोनाबाधीत रूगांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला व दुसरा तपासणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडीत यांनी डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.
त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. या दोन रूग्णामुळे जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 19 झाली आहे. जिल्ह्यात कोविड -19 आजाराने 24 रूग्ण बाधीत होते. त्यापैकी एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर 17 एप्रिल रोजी तीन, 20 एप्रिल रोजी पाच , 23 एप्रिल रोजी 3, 27 एप्रिल रोजी एक, 28 एप्रिल रोजी दोन आणि आज 30 एप्रिल रोजी दोन रूग्ण बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. अशाप्रकारे 19 रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. आता 4 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सर्व नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठीच घरा बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्सचे पालन करावे. गर्दी करू नये. चेहऱ्यावर मास्क अथवा स्वच्छ रूमाल वापरावा. शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या सुचनांचे पालन करावे. डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा यांच्याशी सहकार्य ठेवा, असे आवाहन यावेळी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील आणखी दोन रुग्ण कोविड आजारातून झाले बरे…! · मलकापूर येथील दोन रूग्ण
- Advertisement -






















WhatsApp