अश्रू थांबेना! पतीच्या जाण्याने तुटली मंदिरा बेदी, रोनित रॉयने दिला धीर

अश्रू थांबेना! पतीच्या जाण्याने तुटली मंदिरा बेदी, रोनित रॉयने दिला धीर
- Advertisement -


हायलाइट्स:

  • अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचे, राज कौशल यांचे हृदयविकाराने निधन
  • पतीनिधनामुळे दुःखी झालेल्या मंदिराला रोनित रॉयने दिला धीर
  • डिनो मोरिओ, रोनित रॉयने राज यांना वाहिली श्रद्धांजली

मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती आणि दिग्दर्शक, निर्माता राज कौशल यांचे बुधवारी पहाटे साडेचार वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. राज यांच्या निधनाच्या वृत्ताला या दोघांचे जवळचे स्नेही जितू सलवानी यांनी दुजोरा दिला. राज कौशल ४९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात अभिनेत्री मंदिरा बेदी, वीर आणि तारा ही दोन मुले आहेत.

रोनित रॉयने मंदिराला दिला धीरराज यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्या अंत्ययात्रेचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या फोटो आणि व्हिडीओमधून राज यांना अखेरचा निरोप देण्यासाठी छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार उपस्थित असल्याचे दिसते. त्यामध्ये आशिष चौधरी, रोहित रॉय, डिनो मोरिओ यांचा समावेश होता. राज यांना अॅम्ब्युलन्समधून स्मशानभूमीत नेण्यात आले. यावेळी मंदिराला शोक अनावर झाला होता. पतीच्या निधनामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या मंदिराला रोनितने सावरत धीर दिला. त्यानंतर मंदिरा अॅम्ब्युलन्समधून अंत्यविधीसाठी गेली.


‘राजने अशा प्रकारे जायला नको होते’

राज यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी त्यांच्या आठवणींना सोशल मीडियावर पोस्ट करून उजाळा दिला आहे. राज आणि मंदिरा यांचा जवळचा मित्र रोहित रॉयने देखील इन्स्टाग्रामवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रोनितने लिहिले की, ‘माझ्या आयुष्यात भेटलेला राज कौशल हा सर्वोत्तम व्यक्ती होता. जर तुम्ही भाग्यशाली असाल तरच तुम्ही त्याचे मित्र होऊ शकता… परंतु त्याने अशा प्रकारे जायला नको होते. आम्हाला कुणालाही गुड बाय न म्हणता तो गेला… हे अजिबात योग्य नाही.’

‘राज, हा केवळ माझा मित्र नव्हता तर तो माझा भाऊ देखील होता. यापुढच्या प्रवासतही तू इतरांना आनंद वाटशील याची मला खात्री आहे… तुला नेहमीच घराबद्दल ओढ, ममत्व वाटायचे. त्यामुळे आता देखील स्वर्गात गेल्यावर तू राहण्यासाठी असेच सुंदर घर पाहशील! आम्हा सर्वांचे तुझ्यावर खूप प्रेम आहे हे तुला देखील माहिती होते. परंतु दुर्दैवाने ते तुला सांगण्याची वेळ मात्र कधीच आली नाही. नंतर सांगू नंतर सांगू म्हणत म्हणत अनेक आठवडे उलटले आता मात्र ती वेळ कधीच येणार नाही. पलिकडच्या विश्वात लवकरच आपण भेटू. राज तुला भावपूर्ण श्रद्धांजली.’ अशा शब्दांत रोनितने त्याच्या भावना व्यक्त करत राज कौशलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

मंदिरा बेदी


‘आयुष्य क्षणभंगूर असल्याची पुन्हा जाणीव झाली’

राज यांच्या अचानक निधनामुळे धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया दिनो मोरिओने व्यक्त केली. तो पुढे म्हणाला, ‘खरे तर गेल्या आठवड्यात राज यांना भेटायचे होते. परंतु माझी तब्येत ठीक नसल्याने आमची भेट झाली नाही. राज हा अतिशय उमदा माणूस होता. दिलखुलास व्यक्तिमत्त्व असलेल्या त्याच्यासारख्या व्यक्तीचे हार्ट अॅटकने निधन व्हावे, ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे आयुष्य क्षणभंगूर असल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आपण जगायला हवा अशी पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणीव झाली आहे. मला भावना व्यक्त करायला शब्द सुचत नाहीयेत…’


राज कौशल यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘प्यार मे कभी कभी’ या सिनेमाद्वारे दिनो मोरिआने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. हा सिनेमा १९९९ मध्ये रिलीज झाला होता. दिनो पुढे म्हणाला, ‘राज यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम होता. माझा पहिला सिनेमा मी त्यांच्यासोबत केला होता. त्यांच्यासोबत काम करणे खूपच आनंददायी होते. अत्यंत दिलखुलास व्यक्तिमत्व होते, ते कायम हसायचे आणि समोरच्यालाही हसवत रहायचे. त्यांना कामाची प्रचंड आवड होती. त्यामुळे ते सतत कामाबद्दलच बोलायचे. त्यांचे सिनेमे आणि त्यांच्या नवीन नवीन कलाकृती, त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या कल्पनांबद्दल ते सातत्याने बोलायचे. राज यांच्यासोबत चित्रीकरण करतानाच्या अनेक संस्मरणीय आठवणी माझ्याकडे आहेत. त्यांच्या जाण्यामुळे माझे देखील खूप नुकसान झाले आहे.’





Source link

- Advertisement -