
नागपूर, दि. ८ – आजवर एकाही मुख्यमंत्र्यांना आम्ही प्रत्यक्ष पाहिले नव्हते मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या गावात मुक्काम करून आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का दिला अशी भावना लोहारी सावंगा येथील महिलांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री आपल्या छोट्याशा गावात आले आणि रात्रभर येथेच थांबले याचा झालेला आनंद या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. आज खऱ्या अर्थाने आम्ही दिवाळी साजरी केली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस आज आमच्या कुटुंबाचा भाग झाले. त्यामुळे हा क्षण आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. राज्यातील लाडक्या बहिणींच्या पाठीशी नेहमीच देवाभाऊ उभे राहिले आहेत. त्यांनी दिवाळीत आमच्या गावात मुक्काम करणे ही आमच्यासाठी सर्वात मोठी भाऊबीज भेट असल्याचेही या महिलांनी सांगितले.
00000
- Advertisement -

WhatsApp