भर उन्हात मुख्यमंत्री शेतात – महासंवाद

    - Advertisement -

    नागपूर, दि. ८ – नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी अजून थंडीचा पत्ता नाही, आणि दिवसा तर उन्हामुळे काहीली होत असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर उन्हात शेतात जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली आणि आपण केवळ मंत्रालयात बसणारे मुख्यमंत्री नाही, तर अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आपण सोबत आहोत, असा विश्वास त्यांनी शेतात जाऊन दिला.

    दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात असल्याने त्यांना धीर देण्यासाठी दिवाळी शेतकऱ्याच्या घरी जाऊन साजरी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. त्यानुसार ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळीच ते नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे पोहाेचले. रात्री शेतकरी कुटुंबीयांसह भोजन करून रात्री ते भजनात सहभागी झाले. ८ तारखेला त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन, सरकार आपल्या पाठीशी आहे, असा दिलासा शेतकऱ्यांना दिला. दिलीप सरोदे या शेतकऱ्याच्या शेतात सोनेगाव रिठी येथे भेट दिली.

     00000

    - Advertisement -