काय म्हटलं आहे सुधीर गुप्ता यांनी?
‘आमिर खाननं पहिली पत्नी रिना दत्ता हिला दोन मुलं झाल्यानंतर सोडून दिलं. किरण रावलाही एक मुलगा आहे. आता आजोबा व्हायचं वय झालं अन् तो आता तिसऱ्या पत्नीच्या शोधात आहे’, असं गुप्ता म्हणाले आहेत.
‘आयुष्याच्या नव्या टप्प्याला सामोरे जायचे आहे’
आमिर आणि किरण यांनी संयुक्तपणे दिलल्या प्रसिद्धी पत्रकात, या पंधरा वर्षांत आम्ही अनेक आनंदाचे, समाधानाचे, हास्याचे सुरेख क्षण एकत्रित अनुभवले, असे म्हटले आहे. ‘विश्वास, आदर आणि प्रेम या आघाड्यांवर आमचे ऋणानुबंध घट्ट होत गेले. आता आम्हाला आयुष्याच्या नव्या टप्प्याला सामोरे जायचे आहे. या प्रवासात आम्ही नवरा-बायको असणार नाही. आम्ही मुलांसाठी सहपालक असणार आहोत.
एकमेकांच्या कुटुंबीयांसाठी सदैव सोबत असू. विभक्त होण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी आम्ही विचारपूर्वक घेतला. यासंदर्भात औपचारिक प्रक्रिया आम्ही पूर्ण करू. आम्ही स्वतंत्र राहू मात्र एकमेकांच्या कुटुंबाचा भाग असू. आझाद या आमच्या मुलाच्या संगोपनाची जबाबदारी आमच्यावर एकत्रितपणे आहे. चित्रपट, पाणी फाऊंडेशन तसेच अन्य आवडीच्या प्रकल्पांसाठी आम्ही एकत्रितपणे काम करू’, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आमिर खानचा पहिला विवाह रीना दत्ता यांच्याशी १९८६मध्ये झाला होता. दोघे २००२मध्ये विभक्त झाले. त्यांना जुनैद आणि इरा ही मुले आहेत.