‘आता खरा चोर- पोलिसांचा खेळ सुरू झालाय’, राज कुंद्राच्या अटकेवर गहना वशिष्ठची बोचरी प्रतिक्रिया

‘आता खरा चोर- पोलिसांचा खेळ सुरू झालाय’, राज कुंद्राच्या अटकेवर गहना वशिष्ठची बोचरी प्रतिक्रिया
- Advertisement -


हायलाइट्स:

  • गहना वशिष्ठ हिला देखील अश्लील व्हिडीओ प्रकरणात झाली होती अटक
  • लवकरचं सत्य सगळ्यांसमोर येण्याची गहनाने व्यक्त केली आशा
  • तिला या प्रकरणात अडकवलं गेल्याचं गहनाचं म्हणणं

मुंबई– बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी अटक केली. अश्लील व्हिडीओ बनवणे आणि वेबसाइटवर प्रदर्शित करणे या गुन्ह्यांतर्गत राजला अटक करण्यात आली. आता राजचा आणखी एक साथीदार रायन जॉन थार्प यालाही अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या या अटक सत्रानंतर छोट्या पडद्यावरील अभिनेत्री गहना वशिष्ठ हिने आपली प्रतिक्रिया देत आता खरा मास्टरमाइंड सगळ्यांसमोर येणार असल्याचं म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वी गहनाला देखील अश्लील व्हिडीओ बनवल्याबद्दल पोलिसांनी अटक केली होती.

राज कुंद्राची एकूण संपत्ती किती? अटकेनंतर Video Viral

गहनाचे पब्लिसिस्ट आणि लीगल अफेअर्सचे मुख्य फ्लिन रेमोडियोज यांनी अभिनेत्रीच्या वतीने पत्रकारांना माहिती दिली आहे. गहनाने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, ‘लवकरच सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. खरा मास्टरमाइंड कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहे. हे आता ‘बिग बॉस’ च्या घराप्रमाणे वाटतंय किंवा टीव्हीवरील चोर- पोलिसांच्या कार्यक्रमासारखं सुरू आहे.’ तर फ्लिनने वक्तव्य करत म्हटलं की, ‘गहनाला अडकवलं गेलंय. पोलिसांनी या प्रकरणाच्या तळाशी जाण्याची गरज आहे. देशात शेकडो लोक अजूनही कित्येक व्हिडीओ तयार करून लाखोंची कमाई करत आहेत. खूप मोठमोठ्या व्यक्तींचा देखील या प्रकरणाशी संबंध आहे. परंतु, गहनाला फक्त बळीचा बकरा बनवलं गेलं.’

‘पॉर्न’ व्हिडीओ निर्मिती प्रकरणात नवऱ्याला अटक झाल्यानंतर शिल्पा शेट्टीनं घेतला मोठा निर्णय

गहनाला या प्रकरणात अडकवण्यात आल्याचं सांगत फ्लिन म्हणाला, ‘गहनाला खोटं सांगून यात आणलं गेलं. तिला सांगण्यात आलं की ती एका आंतरराष्ट्रीय कंपनीसाठी काम करतेय. तिला फसवलं गेलं. मी मुंबई पोलिसांचे आभार मानतो की ते या प्रकरणाचा आणखी शोध घेत आहेत. या प्रकरणासोबत खूप मोठ्या लोकांची नावं जोडलेली आहेत.’ दरम्यान, गहनाला देखील अश्लील व्हिडीओ बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पाच महिने तुरुंगात काढल्यानांतर आरोग्याच्या कारणासाठी तिला जामीन देण्यात आला आहे.

सट्टेबाजी तर कधी फसवणूक, वेगवेगळ्या वादात अडकलाय राज कुंद्रा



Source link

- Advertisement -