Home क्रीडा इंग्लंड/न्यूझीलंड इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर!

इंग्लंड/न्यूझीलंड इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर!

लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना आज लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना जेतेपद पटकावून इतिहास घडविण्याची संधी आहे. या दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही आणि आजचा विजेता हा क्रिकेटला लाभलेला नवा जेता ठरणार आहे. त्यामुळे आज कोण जिंकणार? कोणाचे पारडे जड असणार? हा चर्चा होणे साहजिकच आहे. 

02:11 PM

यंदा जेसन रॉयने (४२६) आणि बेयरेस्टो (४९६) हे फॉर्ममध्ये आहेत. ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री हे त्यांना कसे रोखतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. ज्यो रुटने(५४९) मधल्या फळीला आकार दिला, तर स्टोक्स हा संतुलन निर्माण करतो. गोलंदाज जोफ्रा आर्चर याने १९ आणि ख्रिस व्होक्सने १३ गडी बाद केले. लियॉम प्लंकेटनेदेखील आठ फलंदाजांना बाद केले आहे. मागच्या विश्वचषकाचा अंतिम सामना खेळलेले सहा खेळाडू न्यूझीलंड संघात आहेत. विलियम्सनने ५४८, तर रॉस टेलरने ३३५ धावा केल्या आहेत. 

02:10 PM

जॉनी बेयरेस्टो, जेसन रॉय, जोस बटलर आणि बेन स्टोक्स यासारख्या स्टार्सचा इंग्लंड संघ लॉर्डस्वर दावेदार वाटतो. १९७९, १९८७, १९९२ या वर्षांसारखे यंदा जेतेपद हातून निसटू नये याची काळजी या ‘टॉप’ फाईव्हना घ्यावी लागेल. १९७९ मध्ये इंग्लंड विंडीजविरुद्ध फायनल खेळला होता. १९८७ मध्ये कोलकाता येथील ईडन गार्डनवर अ‍ॅलन बॉर्डरच्या आॅस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केला. १९९२ साली इम्रान खानच्या पाक संघाने पुन्हा इंग्लंडला जेतेपदापासून वंचित ठेवले होते.

02:10 PM