हायलाइट्स:
- इन्स्टाग्राम रिचलीस्ट यादीमध्ये प्रियांकाच्या नावाचा समावेश
- एका इंस्टाग्राम पोस्टसाठी कोटींमध्ये मानधन घेते प्रियांका
- प्रियांकासोबत विराट कोहलीचा देखील आहे यादीत समावेश
‘मी खूप चिंतेत आहे’, कुशल बद्रिकेच्या पोस्टने वाढवली काळजी
इन्स्टाग्राम रिचलीस्टच्या यादीनुसार प्रियांका २७ व्या स्थानावर आहे तर विराट कोहली १९ व्या स्थानावर आहे. दरवर्षी ही यादी प्रकाशित केली जाते. यात कलाकार, खेळाडू किंवा लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींचा समावेश असतो. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी कोण किती मानधन घेतो, यावर ही यादी तयार केली जाते. प्रियांकाचे इन्स्टाग्रामवर ६४ मिलियन फॉलोवर्स आहेत. त्यामुळे प्रियांकाने केलेली प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर काही तासांतच वायरल होते. प्रियांका तिच्या अकाउंटवरून करत असलेल्या प्रत्येक प्रमोशनल पोस्टसाठी तब्बल ३ कोटी रुपये मानधन घेते.
मागील वर्षी प्रसिद्ध झालेल्या इन्स्टाग्राम रिचलीस्ट यादीत प्रियांका १९ व्या स्थानावर होती. त्यावेळेस ती एका पोस्टसाठी दोन कोटींचं मानधन घ्यायची. यावेळेस प्रियांकाच्या मानधनासोबत इतर व्यक्तींच्या मानधनातही वाढ झाली आहे. त्यामुळे प्रियांकाचं स्थान खाली घसरलं आहे. विराटचा देखील या यादीत समावेश आहे. विराट एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी ५ कोटी रुपये मानधन घेतो. विराटाचे इन्स्टाग्रामवर १२५ मिलियन फॉलोवर्स आहेत.