
सातारा दि. ७ : सातारा जिल्ह्यातील काही कारखान्यांचे आणि सांगली जिल्ह्यातील काही कारखान्याचे कार्यक्षेत्र एकच असल्याने सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी अंतिम दर जाहीर केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील कारखान्याच्या बोर्ड मीटिंग होऊन अंतिम दर्जा अंतिम दर जाहीर केला जाईल, अशी चर्चा आज जिल्ह्यातील ऊसदर प्रश्न पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली.
बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार अतुल भोसले यांच्यासह जिल्ह्यातील कारखान्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यासह बँकेचे संचालक उपस्थित होते.
साताऱ्यातील उसाचे दर ठरवताना सातारा जिल्ह्यामध्ये रिकवरी झोन दोन ठरवण्यात ठरवावेत ज्यामध्ये 11 ते 12 टक्के आणि 12 टक्के पेक्षा जास्त रिकव्हरी असणारा असे दोन झो न ठरवावेत आणि त्यानुसार दर निश्चित करावे अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी यावेळी केल्या. पालकमंत्री यांच्या या सूचनांना सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच जिल्ह्यातील सर्व कारखान्यांसोबत ऊसदराचे विषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
०००

WhatsApp