ऋषभ पंत हिमा दासला म्हणतो, “सलाम बॉस”

- Advertisement -

नवी दिल्ली: भारताची धावपटू आणि सुवर्णकन्या हिमा दासने नुकत्याच केलेल्या भीमपराक्रमाचे जगभरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हिमाचे ट्विटरवरून अभिनंदन केले होते. आता भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने देखील “सलाम बॉस” म्हणत हिमाचे कौतुक केले आहे. भारताच्या या डावखुऱ्या खेळाडूने हिमाला ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. पंतने म्हटले आहे, ‘हिमा तू प्रेरणादायी आहेस. भारताची सुवर्णकन्या. सलाम बॉस.’ हिमाने मागच्या वीस दिवसांमध्ये तब्बल पाच सुवर्णपदकांची कमाई करत इतिहास रचला होता. तिने 2 जुलैला युरोपमध्ये, 5 जुलैला कुंटो अॅथलेटिक्स मीटमध्ये, 13 जुलैला चेक प्रजासत्ताकमध्ये, 17 जुलैला टाबोर ग्रां प्री मध्ये धावण्याच्या वेगवेगळ्या प्रकारात ही सुवर्णपदके जिंकली आहेत.’हिमा दासने मागील काही दिवसात केलेल्या कामगिरीवर संपूर्ण भारतीयांना गर्व आहे. हिमाने वेगवेगळ्या स्पर्धेत 5 सुवर्णपदके जिंकल्याने प्रत्येक भारतीय तिच्या कामगिरीवर खूश आहे. या कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा’. अशा आशयाचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

- Advertisement -