हायलाइट्स:
- सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे युट्यूबर भुवन बाम
- भुवन बामचा युट्यूबवर आहेत बराच मोठा चाहता वर्ग
- युट्यूबच्या माध्यमातून भुवन कमावतो कोट्यवधी रुपये
आज भुवन बाम भारतातल्या सर्वाधिक लोकप्रिय युट्यूबर्समध्ये गणला जात असला तरीही त्याच्याबद्दल फारशी माहिती कोणालाच नाही. अनेकांना हे देखील माहीत नाही की, त्यानं कोणतीही प्लॅनिंग न करताच स्वतःचं युट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. ‘BB ki Vines’ हे युट्यूब चॅनेल सुरू करण्याआधी भुवननं कोणतंही नियोजन केलं नव्हतं. आज या चॅनेलचे २०.५ मिलियन म्हणजेच जवळपास कोट्यवधी सब्सक्रायबर्स आहेत. भुवन बाम पहिला भारतीय युट्यूबर होता ज्याचे १ कोटीपेक्षा जास्त सब्सक्रायबर झाले होते.
भुवननं त्याच्या करिअरची सुरुवात एका हॉटेलमध्ये गायक म्हणून केली होती. त्याचं असं काम करणं त्याच्या आई- वडिलांना फारसं आवडलेलं नव्हतं. नंतर हळू-हळू युट्यूबवर भुवनच्या व्हिडीओंना प्रसिद्धी मिळू लागली आणि त्यानंही त्यानंतर पूर्ण वेळ व्हिडीओ तयार करण्यासाठी द्यायला सुरुवात केली. आपल्या गाण्यांचं सगळं श्रेय भुवन त्याच्या वडिलांना देतो. वडिलांनी आणलेल्या गाण्याच्या सीडी ऐकत ऐकतच तो गायक झाला होता.
भुवनला त्याच्या काही व्हिडीओंवरून टीकेलाही समोरं जावं लागलं आहे. त्याच्या व्हिडीओमध्ये अश्लिल शब्द आणि शिव्यांचा वापर केलेला असल्यानं त्याच्यावर अनेकदा टीका झाली. पण भुवनचं म्हणणं आहे की, तो त्याच्या व्हिडीओमधून समाजातील सत्य गोष्टीच दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या व्हिडीओमध्ये सध्याची तरुण पीढी ज्या भाषेचा वापर करते तिच भाषा वापरली जात असल्याचं भुवन सांगतो.
युट्यूब आणि व्हिडीओंच्या माध्यमातून भुवन बामची कमाई पाहिल्यावर कोणलाच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. भुवन बामची सध्याची संपत्ती २५ कोटींपेक्षाही जास्त आहे. महिन्याकाठी भुवन अंदाजे २५ लाख रुपयांपेक्षाही जास्त कमाई करतो. या हिशोबानं त्याचं युट्यूबच्या माध्यमातून ३ कोटी रुपये एवढं वर्षिक उत्पन्न आहे.