Home बातम्या आंतरराष्ट्रीय करोना: भारतासाठी अमेरिकेहून येणारी मदत ‘या’ कारणाने उशिराने येणार

करोना: भारतासाठी अमेरिकेहून येणारी मदत ‘या’ कारणाने उशिराने येणार

0
करोना: भारतासाठी अमेरिकेहून येणारी मदत ‘या’ कारणाने उशिराने येणार

[ad_1]

वॉशिंग्टन: अमेरिकेने देऊ केलेली वैद्यकीय साहित्याची मदत भारताकडे घेऊन येणारे विमान उशिराने येणार आहे. अमेरिकी हवाई दलाच्या या विमानात बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्याने त्याची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या विमानाचे उड्डाण बुधवारपर्यंत लांबणीवर पडले आहे, अशी माहिती पँटागॉनने मंगळवारी दिली.

भारतात जाणाऱ्या विमानाच्या दुरुस्तीचे काम निघाल्याने ते बुधवारपर्यंत उड्डाण करू शकणार नसल्याची माहिती ‘यूएस ट्रान्सकॉम’कडून मिळाल्याचे पँटागॉनच्या प्रवक्त्यांनी सांगितले. आतापर्यंत अमेरिकी हवाई दलाची दोन विमाने मदत साहित्य घेऊन भारतात दाखल झाली आहेत. अमेरिकी हवाई दलाची सी-५ सुपर गॅलक्सी, तसेच वन सी-१७ ग्लोबमास्टर ही विमाने सोमवारी भारताकडे येण्यासाठी उड्डाण करणार होती. त्याद्वारे ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर अशा वैद्यकीय साहित्याची मदत भारताला पोहोचवली जाणार आहे. मात्र, या उड्डाणाला विलंब झाल्याने भारतातील तातडीच्या मदत पुरवठ्यावर त्याचा कसा परिणाम होईल, याबद्दल अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही. अमेरिका भारतातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे, असे पँटागॉनचे प्रवक्ते जॉन किरबे यांनी सांगितले.

वाचा: करोना हिरावतोय कुटुंबाचा आनंद; ब्राझीलमध्ये ८०० गरोदर महिलांचा मृत्यू

वाचा:…तर भारतात तीन महिन्यात करोना बळींची संख्या १० लाखांवर!
‘यूएस एड’च्या प्रशासक सामंथा पॉवर यांना अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी पदाची शपथ दिली. त्यानंतर लगेचच पॉवर यांनी अमेरिकेकडून करोनाकाळात भारताला केल्या जाणाऱ्या मदतीचा आढावा घेतला. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजितसिंग संधू यांच्यासोबत त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. करोना विषाणूविरोधातील लढाईत अमेरिका भारतीय नागरिकांना मदतीसाठी सातत्याने काम करीत असल्याचे पॉवर यांनी या वेळी सांगितले.

[ad_2]

Source link