किस्सा- शोले सिनेमात फक्त तीन शब्दांसाठी सांभा पात्राचा जन्म झालेला- जावेद अख्तर

किस्सा- शोले सिनेमात फक्त तीन शब्दांसाठी सांभा पात्राचा जन्म झालेला- जावेद अख्तर
- Advertisement -


हायलाइट्स:

  • इंडियन आयडल १२ प्रमुख पाहुणे म्हणून जावेद अख्तर यांची उपस्थिती
  • ‘शोले’ सिनेमाशी संबंधित अनेक किस्से जावेद यांनी प्रेक्षकांना सांगितले
  • सांभा व्यक्तिरेखेच्या जन्मामागे आहे मनोरंजक किस्सा

मुंबई : गब्बर- ‘अरे ओ सांभा, कितना इनाम रखे है सरकार हम पर…’, सांभा- ‘पूरे ५० हजार…’ ‘शोले’मधील हा संवाद आजही तितकाच लोकप्रिय आहे. सांभाचा उल्लेख करताना गब्बरचे हे संवाद भारतीय सिनेमाच्या इतिहासात कायमस्वरुपी नोंदवले गेले. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का शोले सिनेमात सांभाच्या २ मिनिटांचा भूमिकेचा का समावेश करण्यात आला? याचा खुलास खुद्द जावेद अख्तर यांनी इंडियन आयडल १२ च्या सेटवर केला आहे.

इंडियन आयडल १२ च्या आगामी भागामध्ये जावेद अख्तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. या भागाचे चित्रीकरण झाले असून लवकरच हा भाग प्रसारित होणार आहे. कार्यक्रमाच्या या आगामी भागाचे काही प्रोमो सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यामध्ये जावेद अख्तर यांनी शोले सिनेमाशी संबंधित अनेक मनोरंजक किस्से सांगितले जे आतापर्यंत फारसे कोणाला माहीत नव्हते.


त्या तीन शब्दांसाठी सांभा हे पात्र साकारण्यात आले

जावेद अख्तर यांनी कार्यक्रमात सांगितले की, ‘गब्बरसाठी जेव्हा आम्ही संवाद लिहित होते. तेव्हा आम्हाला त्यात आणखी एका पात्राची आवश्यकता वाटत होती. जेणे करून त्या पात्राच्या माध्यमातून गब्बरला पोलिसांनी त्याच्यावर जे बक्षिस ठेवले आहे, त्याची माहिती मिळेल.’ जावेदजी पुढे म्हणाले, ‘मला अनेकदा लोक म्हणतात की, सर शोले सिनेमाचे संवाद तुम्ही खूपच जबरदस्त लिहिले आहेत. ‘अरे ओ सांभा… कितने आदमी थे… अरे हा काय संवाद आहे का.. त्याचे इतके का कौतुक झाले हे आजतागायत मला कळलेले नाही…’ असे मनोगत व्यक्त केले.


सांभाच्या भूमिकेबद्दल जावेदजी म्हणाले, ‘जेव्हा स्क्रीन प्ले लिहिला तेव्हा सांभा नावाची कुणीही व्यक्ती नव्हती. जेव्हा मी गब्बरसाठी संवाद लिहित होतो तेव्हा मला असे वाटले की, एखादी व्यक्ती स्वतःच जेव्हा सांगेल की सरकारने माझ्यावर ५० हजार रुपये बक्षिस ठेवले आहे, तर असे सांगणे खूपच बालिशपणाचे वाटले असते. आता एखादी मोठी व्यक्ती असते, तेव्हा त्या व्यक्तीसोबत त्याचे हुजरे असतात. ते फक्त त्याच्यासाठीच बोलतात, त्याच्यासाठीच काम करतात. केवळ या एकमेव कारणासाठी शोले सिनेमामध्ये गब्बरच्या तोंडी ‘अरे ओ सांभा, सरकार कितना इनाम रखे हैं हमपर…’ हा संवाद दिला गेला.’


जावेदजी यांनी पुढे सांगितले, ‘शोले सिनेमामध्ये सांभा ही भूमिका मॅक मोहन यांनी साकारली आहे. या सिनेमात मॅक मोहन यांना ‘पुरे ५० हजार…’ हे अवघे तीन शब्दांचे संवाद दिले आहेत. बाकी संपूर्ण सिनेमात त्यांना एकही संवाद नाही. शोले सिनेमासाठी संवाद लिहित असताना ‘सिर्फ ५० हजार’ या तीन शब्दांसाठी या पात्राची निर्मिती झाली आणि पाहता पाहता ते पात्र अतिशय लोकप्रियदेखील झाले.’





Source link

- Advertisement -