कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना म्हणून आयुर्वेदाचा वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

    - Advertisement -

     उस्मानाबाद । प्रतिनिधी । ५ एप्रिल : भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आयुर्वेद औषधींच्या उपयोग करण्याचा सल्ला दिला आहे. मंत्रालया द्वारे कोविड १९  संकट समयी स्वदेखभाल आणि रोग प्रतिबंधक क्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय कसे करावे याचे स्पष्टीकरण जारी केले आहे. 

    कोविड १९ या वैश्विक महामारीमुळे सर्व मानव जात त्रस्त आहे. अशा प्रसंगी आरोग्य टिकविण्याकरिता रोंगप्रतिबंधक उपाय महत्वाचे ठरतात. या महामारी करिता स्वबचाव प्रणाली अतिशय महत्वाची आहे. आज पर्यंत या रोगावर कोणतेही औषध तयार करण्यात आलेले नाही. या रोगापासून स्वतःला वाचाविण्यासाठी आपल्या शरीराची रोग प्रतिबंधक शक्ती वाढविणे उत्तम ठरू शकते. या करिता आयुर्वेदिक उपाय दिनचर्या आणि ऋतुचर्या यावर आधारित आहे. या द्वारे आपली रोग प्रतिबंधक क्षमता वाढवता येते.

    आयुष मंत्रालय श्वसन तंत्र आरोग्य संबंधी “स्वयं देखभालीसाठी काही दिशा निर्देश दिले आहेत.

    अ.   सामान्य उपाय

    १.     संपूर्ण दिवस गरम पाणी प्यावे.

    २.    दररोज किमान तीस मिनिटं योगासन, प्राणायाम आणि ध्यान करावे.

    ३.    हळद, जिरे, धने आणि लसूण इ. मसाले पदार्थचा प्रयोग जेवणात करावा.

    आ. रोग प्रतिबंधक क्षमता वाढविण्या करिता आयुर्वेदिक उपाय.

    १.     एक चमचा चवनप्राश सकाळी घ्यावे.

    २.   मधूमेहाच्या रुग्णांनी साखर विरहित चवनप्राश घ्यावे.

    ३.    तुळशीची पाने, दालचिनी, काळी मिरी, सुंठ आणि मनुक्या पासून तयार केलेला काढा दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्यावा. चवी नुसार यात गूळ किंवा ताजा लिंबू रस मिसळावा.

    ४   गोल्डनमिल्क १५० मी.ली गरम दूधामध्ये हळद घालून दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्यावे.

    इ.      सामान्य आयुर्वेदिक उपाय.

    १.     सकाळ संध्याकाळ तीळ/खोबरेल तेल किंवा तूप दोन्ही नाकपुढीत लावावे.

    २.    एक चमचा तीळ/खोबरेल तेल तोंडात घेऊन चूळ भरावी नंतर ते थुंकावे नंतर गरम पाण्याने गुळण्या करावयात. असे एकदा किंवा दोनदाकरावे. 

    ई.      खोकला/घश्यात खवंखवं होत असेल तर,

    १.     दिवसातून किमान एकदा पुदिन्याची पाने किंवा ओवा घालून गरम पाण्याची वाफ घ्यावी.

    २.    खोकला किंवा घश्यात खवंखवं होत असेल तर लवंग चूर्ण, गूळ किंवा मधामध्ये मिसळून दिवसातून दोन तीन वेळेस घ्यावे.

    ३    हे उपाय सामान्य कोरडा खोकला/ घश्यात खवंखवं असल्यास लाभदायक आहे लाभ होत नसेल तर डॉक्टरचा सल्ला घ्यावा.  असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

    - Advertisement -